क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ आवेदने ऑनलाईन मागविण्यास मुदतवाढीबाबत krantijoti savitribai fule ideal award
संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४ दि.२८/०६/२०२२.
२. संचालनालयाचे पत्र क्र शिसं/राशिपु/२०२४/अ-२/विद्याशाखा/३२२३ दि.२१/०६/२०२४
३. संचालनालयाचे पत्र क्र.शिसं/राशिपु/मुदतवाढ /२०२४/अ-२/विद्याशाखा/ ३५६९दि.०४/०७/२०२४
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच
समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य
शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने
सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://forms.gle/7yYfYGJ5YGxVFAiu7 या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ जून, २०२४ रोजी पासून दिनांक ०५ जुलै, २०२४ रोजी पर्यंत सादर करावीत. सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे. असे संचालनालयाच्या संदर्भ क्र.२ अन्वये कळविण्यात आले होते.
पुरस्कारासाठी आवेदने सादर करणाऱ्या शिक्षकांचा काही जिल्हे तसेच काही प्रवर्ग याबाबत अल्प प्रतिसाद पाहता दिनांक ११ जुलै, २०२४ रोजी पर्यंत आवेदने सादर करण्यासाठी संचालनालयाच्या संदर्भ क्र.३ अन्वये मुदतवाढ देण्यात आली होती.
सद्यस्थितीत पुरस्कारासाठी आवेदने सादर करणाऱ्या शिक्षकांचा काही जिल्हे तसेच काही प्रवर्ग याबाबत अल्प प्रतिसाद पाहता दिनांक १८ जुलै, २०२४ रोजी पर्यंत आवेदने सादर करण्यासाठी या पत्रान्वये पुनश्चः मुदतवाढ देण्यात येत आहे.
आपल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी जास्तीत जास्त आवेदने सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. पुरस्कारासाठी आवेदने सादर करण्यासाठी सर्व शिक्षकांपर्यंत पुनश्चः स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करावेत तसेच वर्तमानपत्रात जाहीर करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास पाठवावा.