कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत korona leave mandhan shasan nirnay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत korona leave mandhan shasan nirnay 

कोरोना विषाणूंचा (COVID-१९) प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य शासनाचे स्तरावरून विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. याकरिता वेळोवेळी शासन निर्णय अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. राज्य शासनाचे निर्देशानुसार कार्यालयीन उपस्थितीचे विविध स्तरावर पालन करण्यात येत आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत विविध स्तरावर करार कर्मचारी कार्यरत आहेत. या करार कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संदर्भातील विविध कामकाज सोपविण्यात आलेले आहे. कोरोनाबाबतचे सोपविण्यात आलेले कामकाज पार पाडताना तसेच कार्यालयीन उपस्थितीबाबत घालण्यात आलेल्या निबंधाचे पालन करूनही काही कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा होऊन, त्यांना पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. तसेच परिस्थितीनुरूप वैद्यकीय सल्ल्यानुसार स्थापित केलेल्या institutional Isolation मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काहींना Home Isolation राहणेबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांस कर्तव्यावर लवकर रूजू होता येत नाही. तरी अशा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचा सदर अनुपस्थिती कालावधी त्या- त्या स्तरावर घोषित करण्यात आलेल्या कोरोना कक्षातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त (शासकीय / खाजगी रूग्णालयाकडील) वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे कर्तव्य कालावधी म्हणून गणण्यात यावा.