केंद्रप्रमुख सेवा प्रवेश नियमावली मध्ये सुधारणा करणेबाबत kendrapramukha seva niyamavali 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रप्रमुख सेवा प्रवेश नियमावली मध्ये सुधारणा करणेबाबत kendrapramukha seva niyamavali 

संदर्भ-१. शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४८०/टिएनटी-१/दि.२५/१/२०२४

२. संचालनालयाचे पत्र क्र.१८२८/दि.६/३/२०२४

महोदय,

विषयांकित प्रकरणाबाबतचे शासनाचे संचालनालयास उद्देशून लिहिलेले व आपणांस प्रत पृष्ठांकित केलेल्या संदर्भ क्र.१/दि.२५/१/२०२४ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने संचालनालयाचे संदर्भ क्र.२/दि.६-३-२०२४ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालय येथे सदर प्रकरणी याचिका दाखल झालेली असल्याने केंद्रप्रमुख सेवाप्रवेश नियमावलीमध्ये सुधारणा करणेबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून तत्परतेने करणेबाबत कळविण्यात आलेले होते. केंद्रप्रमुख सेवाप्रवेश अधिसूचना अंतरिम करण्यात आली आहे परंतु अदयापपर्यंत अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही.

तरी सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर (याचिका क्र ८१९१/२०२३) येथे याचिका दाखल झालेली असून याबाबत विविध संघटना पाठपुरावा करीत असल्याने तसेच सुधारित केंद्रप्रमुख सेवाप्रवेश नियमावली अभावी केंद्रप्रमुख सरळसेवा निवडीसाठीची परीक्षा घेणेबाबतची कार्यवाही करणे शक्य होत नाही. तरी कृपया केंद्रप्रमुख सेवाप्रवेश नियमावलीमध्ये सुधारणा करणेबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून तत्परतेने करण्यात यावी जेणेकरून केंद्रप्रमुख भरताबाबत कार्यवाहा शाघ्रर्तन करणे शक्य हाइल ही विनंती.