पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळालयानंतर एक वेतनवाढ देवून वेतननिश्चिती करण्याबाबत kendrapramukh
महोदय,
विषयांकित प्रकरणी वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायांस अनुसरुन पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
जे शिक्षक / मुख्याध्यापक वरिष्ठ किंवा निवडश्रेणी वेतन घेत असून ज्यांची केंद्र प्रमुख या पदावर नियुक्ती झाली आहे, त्यांची केंद्र प्रमुख पदावरील वेतन निश्चिती होणार नाही, त्यांना शिक्षक/मुख्याध्यापक पदावर अनुज्ञेय असलेले वेतन अनुज्ञेय राहील, तसे न केल्यास शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त व ग्राम विकास विभागाच्या अधिनस्त प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातून केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती घेतलेल्यांच्या वेतनात तफावत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळालेल्या, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची वेतन निश्चिती करताना वेतनवाढ देता येणार नाही.
सदर पत्र वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५०७/२२/सेवा-३. दिनांक १२/२०२२ अन्वये दिलेल्या निर्देशास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
तरी उपरोक्त निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, ही विनंती.