कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या प्राथ/माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणेबाबत kayam vinaanudanit shala grand
शासन निर्णय दि.14/10/2024 च्या अंमलबजावणीबाबत.
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणे.
संदर्भ:
1. शासन निर्णय क्रःमाशाअ-2024/प्र.क्र. 71/एसएम-4, दि.14/10/2024. 2. शासन पत्र क्रःसंकीर्ण-2024/प्र.क्र.209/एसएम-4, दि.26/11/2024,
वरील विषयाबाबत संदर्भीय पत्र पहावीत. (प्रत संलग्न)
संदर्भ क्र.2, दि.26/11/2024 च्या पत्रात नमूद केल्यानुसार मा. मंत्रीमंडळाच्या दि.10/10/2024 रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेला (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना (1) अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे (2) त्रुटीत असलेल्या व विहित कालावधीत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वैकल्पिक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे (3) अघोषित शाळा/तुकडयांना अनुदानासाठी पात्र करणे (4) डोंगराळ व दुर्गम भागातील पटसंख्या निकषात सुधारणा करणे व अनुदानास पात्र करणे व (5) सैनिकी शाळांच्या अतिरिक्त
तुकडयांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, शासन निर्णय दि. 14/10/2024 निर्गमित करण्यात आला असून, सदर शासन निर्णयान्वये, यापूर्वी अनुदान घेत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा, अघोषित शाळा/तुकडया तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकडया यांना दि.01 जून, 2024 पासून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनुदान पात्र ठरत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/तुकडया व शिक्षक/शिक्षकेतर पदांना, प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व
शर्तीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत.
सदर शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने, खालीलप्राणे कार्यवाही करून, त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.
त्याअनुषंगाने शासनपत्र दि.26/11/2024 मधील मुद्दा क्र. 1, 3 व 4 बाबत शासनास अहवाल सादर करावयाचा असल्याने शासन निर्णय दि.06/02/2023 अन्वये अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत माहे नोव्हेंबर, 2024 अखेर प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या 20 टक्के, 40 टक्के व 60 टक्के माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकडयांची व त्यावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी सोबतच्या विहित प्रपत्रात हार्ड व सॉफ्ट कॉपी स्वरूपात DV- TTSurekh या फॉट मध्ये सादर करावी व व सदर शासन निर्णयासोबत विहित केलेल्या प्रमाणपत्रासह दि.10/12/2024 रोजी समक्ष उपस्थित राहून वरील माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी.