नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरणे सुरू Jnvst navoday exam application form start 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरणे सुरू Jnvst navoday exam application form start 

नवोदय विद्यालय परीक्षा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरावा 👇👇

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2025 ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता नवोदय स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जातो जवाहर नवोदय शाळा या केंद्र शासनामार्फत चालवल्या जातात.

*JNVST ADMISSION NOTIFICATION LINK*👇

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/assets/pdf/Final_Prospectus_2025.pdf

नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरण्याची मुदत आपण सदर पोस्ट मध्ये पाहू शकता अंतिम मुदत पाण्यासाठी खाली माहिती दिलेली आहे

*नवोदय विद्यालय परीक्षा 2025 प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी अधिकृत लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक वर जाऊन आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे देखील सदर पोस्ट मध्ये दिलेली आहेत जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर  भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख  16 सप्टेंबर 2024 आहे. 16 सप्टेंबर पर्यंत पात्र विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या संकेत स्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात. सदर तारखे नंतर फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे तात्काळ फॉर्म भरून आपला अर्ज सबमिट करावा

नवोदय परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म फॉरमॅट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/assets/PDF/certificate_2025.pdf

*फॉर्म भरण्याची मुदत 16 सप्टेंबर पर्यंत असली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाल्याने साइटवर लोड येऊन वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने शक्यतो नवोदय विद्यालय परीक्षा 2025 चे फॉर्म लवकरात लवकर भरून घेणे आवश्यक असते. फॉर्म भरण्याची तारीख संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाढीव मुदत देण्यात येणार नाही अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपला फॉर्म लवकर सबमिट करून घ्यावा

*नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*

फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधीच तयार करून ठेवावीत जेणेकरून फॉर्म भरताना अडचण येणार नाही त्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती पहावीत

फॉर्म भरताना लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.*

1 *विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीचा विद्यार्थ्यांच्या मागील तीन वर्षे शिकत असलेल्या शाळांचा तपशील व विद्यार्थ्यांची माहिती असलेला फॉर्म योग्य फॉरमॅटमध्ये घेणे आवश्यक आहे.*

2 *फॉर्म भरतेवेळी 10 ते 100 KB साईज असलेली विद्यार्थ्यांची सही अपलोड करणे आवश्यक असते.*

3 *सर्व कागदपत्रे जेपीजी JPG फॉरमॅटमध्ये स्कॅन केलेली असावीत.*

4 *विद्यार्थ्यांच्या सही बरोबर पालकांची सही सुद्धा 10 ते 100 KB पर्यंतच्या साईज मध्ये असावी.*

5 *विद्यार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना आधार लिंक मोबाइल नंबर वर ओटीपी येऊन विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आधार मार्फत घेतली जाते. त्यामुळे आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.*

6 *जर आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरत असलेल्या जिल्ह्याचे रहिवास असल्याबाबतचा योग्य दाखला अपलोड करणे आवश्यक असते. यामध्ये आपण तहसीलदारांमार्फत दिला जाणारा रहिवाशी दाखला अपलोड करू शकता.*

7 *अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो 10 ते 100 KB च्या दरम्यानचा असावा*

*वरील सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये आणि JPG फॉर्मेट मध्ये असणे आवश्यक आहे.*

*नवोदय विद्यालय परीक्षा 2025 तारीख*

*महाराष्ट्र मध्ये नवोदय विद्यालयची 2024- 25 ची परीक्षा रविवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी 11.30 वाजता होणार आहे.*

Leave a Comment