JEE/NEET/MHT-CET-2026 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करणेकरिता मुदतवाढ देणेबाबत JEE/NEET/MHT-CET application
महाज्योतीमार्फत JEE/NEET/MHT-CET-2026 परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरीता दि.26/06/2024 रोजी पासुन ते दि.10/08/2024 रोजी पर्यंत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अर्ज देखील या कार्यालयास सादर केलेले आहे. परंतु काही विद्यार्थ्यांकडे आवश्यक असलेले कागदपत्रे उपलब्ध नसल्याने महाज्योती या कार्यालयास सदर योजनेकरिता अर्ज सादर करू शकले नाही अश्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या कॉल सेंटरला सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विनंती सुध्दा केलेली आहे. विद्यार्थ्यांनी या कार्यालयास केलेली विनंती विचारात घेता सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्यासाठी दि.10/09/2024 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या संकेतस्थळावर सदर परिपत्रकासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.