जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत janma mrutyu nond kayda
संदर्भ:- १. भारत शासन राजपत्र दि.११ ऑगस्ट, २०२३.
२. गृह विभाग, महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. १० सप्टेंबर, २०२३.
महोदय/महोदया,
उपरोक्त विषयी संदर्भिय भारत शासन राजपत्राव्दारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी/उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. या सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारींची चौकशी करणेकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची (SIT) स्थापना करण्यात आलेली आहे. सबब उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये, ही विनंती.