आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत invalid aadhar for sanchmanyata 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत invalid aadhar for sanchmanyata 

शाळेतील दिनांक ३०.०९.२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत.

संदर्भ : मा. शिक्षण संचालक यांचे पत्र क्र. ६१९४ दि.२३.०९.२०२४.

उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतात. मा. मंत्री महोदय यांच्या समवेत दिनांक १९.०९.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ३०.०९.२०२३ रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्याथ्यर्थ्यांपैकी आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२३-२०२४ ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा

👉थकीत वेतन बिले ऑनलाईन काढणे बाबत

👉विद्यार्थी सुरक्षा काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत

👉बीएलओ या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत

👉तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक

👉तक्रारपेटी सखी सावित्री समिती सीसीटीव्ही बसविल्याशिवाय वेतन आदान न करणे बाबत

👉अदानी समूहाकडे शाळा हस्तांतरित शासन निर्णय

👉या मुलांना मिळणार 2250 रुपये प्रति महिना

👉एकल पालकांच्या मुलांना बाल संगोपन योजनेअंतर्गत 2250 रुपये मिळणार

👉शाळा आता पाच तासात भरणार सर्व शाळांना आदेश

तथापि, विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील सन २०२३- २०२४ च्या मंजुर पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळां तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्याध्यांच्या नावाचा यादीसह अर्ज करतील अशा शाळांच्या बाबतीत संबंधित बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबींची खात्री करावी. (प्रमाणपत्र, पडताळणी प्रपत्र १ ते ३ सोबत जोडले आहे.)

१. नाव, लिंग किवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत यांची शहानिशा करुन असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.

२. ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होवू शकले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राहय धरण्यात यावेत.

३. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट (Duplicate) असल्याचे स्टुडट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे, याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करुन योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्यांची नोंद करणे.

४. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देवून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेल प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी. ५. ज्या शाळांची किमान ९० टक्के विद्यार्थी शाळांनी आधार वैध केलेले आहेत. त्याच शाळांतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेवून पडताळणी करण्यात यावी.

६. आधार इनव्हॅलीड/अनप्रोसेसड/आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेवून खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावे. सोबत : प्रमाणपत्र

👉👉अवैध आधार संच मान्यतेसाठी ग्राह्य धरणेबाबत परिपत्रक