खोट्या माहितीद्वारे बदली करुन घेणाऱ्या शिक्षकांवर होणार निलंबनाची कारवाई, तालुकास्तरीय समितीही राहील जबाबदार intra district online transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खोट्या माहितीद्वारे बदली करुन घेणाऱ्या शिक्षकांवर होणार निलंबनाची कारवाई, तालुकास्तरीय समितीही राहील जबाबदार intra district online transfer 

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीचे वेळापत्रक जाहीर ! खोट्या माहितीद्वारे बदली करुन घेणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई, तालुकास्तरीय समितीही राहील जबाबदार

राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण १८ जून २०२४ रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य स्तरावरून बदली प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण १८ जून २०२४ रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य स्तरावरून बदली प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहेत. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व या प्रक्रियेत सुसूत्रीकरणासाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती व कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

…तर समितीलाही धरणार जबाबदार

एखाद्या शिक्षकाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याचे आढळल्यास त्याचे निलंबन करून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे बदली प्रक्रियेत कोणी खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती बदलीचा लाभ घेणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे घडल्यास तालुकास्तरीय समितीलाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी दिला आहे.

खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कारवाई

राज्य सरकारच्या धोरणानुसार ऑनलाइन पोर्टलद्वारे शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्यस्तरावर निश्चित वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पाडली जाईल. पहिल्या टप्प्यात बदली पात्र, अधिकार प्राप्त शिक्षकांची माहिती संकलित केली जात आहे. शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल.

– कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

बदली प्रक्रियेचे वेळापत्रक

• १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादीचे प्रसिद्धीकरण, हरकती, पडताळणी, अद्ययावतीकरण

• १ ते ३१ मार्च समानीकरणांतर्गत रिक्त पदे, बदलीसाठी रिक्त पदांची निश्चिती

• १ ते २० एप्रिल बदलीसाठी नियुक्त यंत्रणेस माहिती देणे

• २१ ते २७ एप्रिल समानीकरणांतर्गत रिक्त पदांची निश्चिती

• २८ एप्रिल ते ३ मे विशेष संवर्ग शिक्षक भाग १ शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे

• ४ ते ९ मे विशेष संवर्ग शिक्षक भाग २ शिक्षकांसाठी रिक्त

जागांची घोषणा, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे

• १० ते १५ मे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे

• १६ ते २१ मे बदली पात्र शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे

• २२ ते २७ मे विस्थापित शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे

• २८ ते ३१ मे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे

Join Now