नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणाबाबत Induction Programme
संदर्भ : १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रयम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/ २०२४-२४/०५०७० दिनांक १७/११/२००४
२) MAH- TIET परीक्षा नोव्हेंबर-२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक ०१ अन्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी एकाच वेळी जिल्हास्तरावर ०७ दिवसीय (५० तासांचे) प्रशिक्षण दिनांक ०४/११/२०२४ ते दिनांक ११/११/२०२४ कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.
तथापि MAII-TET परीक्षा नोव्हेंबर-२०२४ चे आयोजन रविवार दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेत काही नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षक परीक्षा देणार आहेत. राज्यस्तरावरून प्रशिक्षण कालावधीच्या पूर्व नियोजनामध्ये दिनांक १०/११/२०२४ रोजी रविवार असल्यामुळे सुट्टी गृहीत धरण्यात आलेली आहे. नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी TET परीक्षेकरता आपले मूळ गाव/जिल्ह्याची निवड केली असल्यामुळे परीक्षेच्या आधीचा दिवस दिनांक ०९/११/२०२४ व परीक्षेनंतरचा दुसरा दिवस दिनांक ११/११/२०२४ या दोन दिवशी प्रवासाकरिता काही नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सुट्टी देण्याची विनंती केली आहे.
उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने TET परीक्षेसाठी ज्या नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांनी सुट्टीची मागणी केली त्यांना परीक्षेच्या आधीच्या दिवशी दिनांक ०९/११/२०२४ व परीक्षे नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ११/११/२०२४ रोजी सुट्टी द्यावी. अशा नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचे दोन दिवसांच्या कालावधीत होऊ न शकणारे प्रशिक्षण, नियोजित प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर लगतच्या सलग दोन दिवसात पूर्ण करून घ्यावे. तसेच उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल याची दक्षता घेण्यात यावी. (माननीय संचालक महोदय यांच्या मान्यतेने)