भारतीय राष्ट्रध्वजाचा आकार किती आणि कसा असावा Indian tricolour Flag
भारत सरकारच्या “भारतीय ध्वज संहिता २००६ मध्ये कलम आठ ३.३९ अनुसार, “सामान्यतः उच्च न्यायालय, सचिवालय, आयुक्तांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, तुरुंग व जिल्हा मंडळे, नगरपालिका व जिल्हा परिषदा व विभागीय / सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांची कार्यालये “या सारख्या इमारतींवर ध्वज लावणे” अपेक्षित आहे.
ध्वजसंहितेच्या कलम एक २.२ नुसार, “जनतेतील कोणतीही व्यक्ती / खाजगी संघटना शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या व समारंभांच्या दिवशी किंवा अन्यथा ध्वजारोहण” करता येते.
भारतीय ध्वजसंहितेत अलिकडे झालेल्या वरील दुरुस्तीच्या पाश्र्वभूमीवर, भारतीय राष्ट्रध्वजाचे जनसामान्यांमध्ये महत्त्व अधोरेखित करुन ध्वजारोहणाबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे व राष्ट्रध्वज संहितेबाबत जागरुकता निर्माण करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. राज्यातील नागरिकांनी आणि खाजगी संघटनांनी राष्ट्रध्वजाचा मान राखावा आणि त्यातून आपले राष्ट्रप्रेम दर्शवावे असे आवाहन करीत असतांना सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या इमारतींवर सर्व दिवशी राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत संदर्भिय दि. ३० ऑगस्ट, २०१३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. सदर शासन निर्णयात देण्यात आलेल्या सूचनेनुसार ध्वजारोहणासाठी आवश्यक असणारी व्यवस्था तीन महिन्याच्या आत करणे ग्राम पातळीवरील व तालूका पातळीवरील काही कार्यालयांना शक्य नसल्याचे
निदर्शनास आल्याने संदर्भाधीन शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास्तव, संदर्भीय शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात येऊन खालीलप्रमाणे सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे –
शासन निर्णय –
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्याच्या मोहिमेच्या पहिल्या टप्यात राज्यातील फक्त विभागीय व जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर संबंधित कार्यालयांनी राष्ट्रध्वज फडकविण्याची व्यवस्था करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. इमारतीचा आकार व उंची, स्थान (Location) विचारात घेऊन इमारतीवर उंच, ठळकरीत्या सर्वांना दि अशा पद्धतीने खालीलपैकी ४ प्रमाणित आकारापैकी एका आकाराचा ध्वज वर्षाचे सर्व दिवस (राष्ट्र संहितेत नमूद केलेले अपवादात्मक प्रसंग वगळून) फडकविण्यात यावा.
ध्वजाचा आकाराचा क्रमांक
आकार (मि.मि.)
३,६०० x २,४०० मि.मि.
आकार (चौ.फू.)
सुमारे ११.९२x ७.१० फूट
निदर्शनास आल्याने संदर्भाधीन शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास्तव, संदर्भीय शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात येऊन खालीलप्रमाणे सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे –
शासन निर्णय-
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्याच्या मोहिमेच्या पहिल्या टप्यात राज्यातील फक्त विभागीय व जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर संबंधित कार्यालयांनी राष्ट्रध्वज फडकविण्याची व्यवस्था करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. इमारतीचा आकार व उंची, स्थान (Location) विचारात घेऊन इमारतीवर उंच, ठळकरीत्या सर्वांना दिसेल अशा पद्धतीने खालीलपैकी ४ प्रमाणित आकारापैकी एका आकाराचा ध्वज वर्षाचे सर्व दिवस (राष्ट्रध्वज संहितेत नमूद केलेले अपवादात्मक प्रसंग वगळून) फडकविण्यात यावा.