भारतातील 10 महान शास्त्रज्ञ वैज्ञानिक indian scientist
Indian Scientists. भारतीय संस्कृती जगातील प्राचीनतम सभ्यता म्हणून ओळखले जाते. वैदिक काळापासून भारतामध्ये अनेक महान लोक होऊन गेले. पुरातन काळी भारतीय संस्कृती अतिशय प्रगतशील संस्कृती होती. अशी आजही जगन्मान्यता आहे. भारताने अगदी प्रारंभीच्या काळापासून विज्ञान तंत्रज्ञानामध्ये वेगळे अस्तित्व निर्माण केलेला आहे. Indian Scientists १० महत्वाचे सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ कोणते या प्रश्नाचं उत्तर इथे पाहूया.
आपल्या नवनवीन संकल्पना आणि नवनवीन शोधाने मानवाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण हातभार लावलेला आहे. विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मानवी जीवनातली प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटी ठरलेली असते. वैदिक काळापासून भारताने अध्यात्मिक संस्कृती जपली. त्याचबरोबर वैज्ञानिक प्रगती सुद्धा केली.
प्राचीन काळातील अनेक ऋषी मुनींनी जगातील लोकांच्या जीवनातील विज्ञानाचे महत्त्व वेळोवेळी सांगून दिलं. आधुनिक विज्ञानाने सुद्धा प्राचीन भारताचे आध्यात्मिक विज्ञान मान्य केले आहे.
आधुनिक विज्ञानाच्या पूर्वी आर्यभट्ट या भारतात जन्मले. आणि सर्वप्रथम शून्य ही संकल्पना जगाला दिली. शून्याचा शोध हा आधुनिक गणित आणि भौतिक शास्त्राचा महत्त्वाचा पाया समजला जातो. आर्यभट्ट यांच्यापासून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत असंख्य वैज्ञानिक भारतात होऊन गेले. या लेखात आपण Indian
Scientists – महत्वाचे 10 महान भारतीय शास्त्रज्ञ
यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. हि माहिती
1. सी. व्ही. रमण
7 नोव्हेंबर 1888 रोजी जन्मलेले सी व्ही रमण हे भारताच्या तसेच जगाच्या विज्ञानासाठी महत्वाची व्यक्ती आहेत. वयाच्या अकराव्या वर्षी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असलेले रोमन तेराव्या वर्षी एफ ए ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांना सरकार तर्फे शिष्यवृत्ती सुद्धा मिळू लागली.
डॉ. सी व्ही रामन (Indian Scientist) यांना त्यांच्या रामन इफेक्ट या त्यांच्या महत्त्वाच्या संशोधन 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. डॉ. रमण यांच्या रूपाने सर्वप्रथम आशिया खंडाला नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्याचबरोबर नोबेल मिळवणारे ते पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती होते. 1954 साली त्यांना भारताचा सर्वात महत्त्वाचा नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आले.
2) श्रीनिवास रामानुजन :-
रामानुजन जगप्रसिद्ध गणितज्ञ आहेत. अगदी बालवयापासून गणितामध्ये तरबेज असणारे रामानुजन पुढे अनेक संशोधनाचे जनक ठरले. सध्याच्या काळातील अनेक गणितीय सिद्धांत तसेच विश्लेषण परिपूर्ण असण्याचा श्रेय रामानुजन यांना जाते. त्यांनी स्वतः निर्माण केलेले अनेक गणिताचे सिद्धांत जागतिक पातळीवर मान्य करावे लागले.
त्यांच्या रामानुजन थिटा फंक्शन त्याचबरोबर रामानुजन प्राईम या महत्त्वपूर्ण संशोधनाने गणिताच्या आधुनिक विकासाला चालना दिली. कृष्णस्वामी अय्यर या त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांची गणितावर असलेली पकड ही खूप सुरुवातीलाच ओळखली होती. त्यांनी वेळोवेळी श्रीनिवास रामानुजन यांना प्रोत्साहन दिले
३) जगदीश चंद्र बोस :-
पश्चिम बंगालमधील विक्रमपूर या गावात जगदीश चंद्र बोस यांचा जन्म झाला. 30 नोव्हेंबर 1858 रोजी जन्मलेले जगदीश चंद्र बोस हे एक असामान्य प्रतिभावंत व्यक्तिमत्व होतं. त्यांनी फक्त वनस्पती शास्त्रच नव्हे तर भौतिक शास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी बहुआयामी अभ्यास आणि संशोधन केलं होतं.
रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ओप्टीक्स यांची भारतामध्ये सुरुवात करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. फक्त वनस्पती विज्ञानातील योगदान आज नाही तर त्यांनी सर्वप्रथम भारतीय उपखंडामध्ये प्रायोगिक विज्ञान आणलं.
सेमीकंडक्टर जंक्शन वापरून वायरलेस कम्युनिकेशन मार्फत रेडिओ लहरी शोधणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते.
कोणताही शोध हा संपूर्ण मानव जातीसाठी असतो. असं त्यांचं ठाम मत होतं. कोणत्याही संशोधनाचे पेटंट घेणे हे त्यांनी कधीच मान्य केलं नाही. आणि म्हणून त्यांना मुक्त तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते.
4) एम. विश्वेश्वरय्या :-
1955 साली भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एम. विश्वेश्वरय्या हे केवळ एक अभियंता च नाही, तर शिक्षण सम्राट आणि मोठे राजकारणी होते. त्यांनी सार्वजनिक हितासाठी केलेली कामे पाहून, पाचवा किंग जॉर्ज याने ब्रिटिश साम्राज्य मध्ये त्यांना नाईट कमांडर केले होते. त्याचबरोबर बरीच वर्ष त्यांनी मैसूरचे दिवान म्हणूनही काम पाहिले.
इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये मानले जाणारे ब्लॉक इरिगेशन सिस्टीम व ऑटोमॅटिक स्लुईस गेट्स या दोन्ही विश्वेश्वरय्या यांच्या संकल्पना आहेत. जगामध्ये क्वचित ठिकाणी पाहायला मिळणारा, विहिरीचे पाणी फिल्टर करण्याचा मार्ग त्याने शोधून काढला.
15 सप्टेंबर हा एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस इंजीनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. ते Indian
5) डॉक्टर होमी भाभा :-
भारतामधील अणुऊर्जेचे जनक असलेले डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 1909 साली मुंबई येथे झाला. कमी प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या युरेनियम ऐवजी; मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या थेरीयम मधून वीज निर्मिती करणे. हि संकल्पना सर्वप्रथम होमी भाभा यांनी वापरली.
देशाच्या वैज्ञानिक प्रगती मध्ये डॉक्टर होमी भाभा यांचं योगदान हे सर्वश्रेष्ठ आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च त्याचबरोबर भाभा अनु संशोधन संस्था यांची स्थापना त्यांनी केली. त्याच बरोबर ते पहिले भारतीय होते ज्यांनी अनु ऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले.
6) विक्रम साराभाई :-
डॉक्टर साराभाई हे भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक आहेत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाचा सहभाग असलेल्या साराभाई कुटुंबातील ते एक आहेत. सदन पार्श्वभूमी असलेले विक्रम साराभाई हे एक मोठे उद्योगपती, वैज्ञानिक आणि संशोधक होते.
1960 मध्ये VASCSC म्हणजेच विक्रम ए. साराभाई कमुनिटी सायन्स सेंटरची स्थापना त्यांनी केली. ज्यात प्रामुख्याने गणित विज्ञान यांचा अभ्यास केला जातो.
इतकेच नाही तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो च्या स्थापनेत सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना 1966 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर 1972 साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट यासारख्या महत्वाच्या संस्थांसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
7) चंद्रशेखर सुब्रमण्यम :-
1883 साली भौतिकशास्त्र मधील नोबेल पारितोषिक मिळवणारे चंद्रशेखर सुब्रमण्यम हे एक भारतीय- अमेरिकन खगोल शास्त्रज्ञ होते. हे पारितोषिक त्यांना ताऱ्यांची रचना आणि उत्क्रांती याबद्दलच्या अतिशय महत्त्वाच्या संशोधनामुळे मिळाले होते.
ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा शोध लावण्यासाठी त्यांनी गणिताचा अत्यंत खुबीने वापर केला. कृष्णविवरांचे गूढ, त्याचबरोबर मोठ-मोठ्या ग्रह तारे यांच्या संदर्भात अनेक आधुनिक सिद्धांत निर्माण करणे सोपे झाले.
8) डॉ. सलीम अली :-
जगप्रसिद्ध पक्षीतज्ञ व निसर्गशास्त्र असलेले सलीम अली यांना भारताचा पक्षी म्हणून ओळखले जाते. भारतातील असंख्य पक्ष्यांचे निरीक्षण, सर्वेक्षण एवढच नाही तर संशोधन करून त्यावरील पुस्तके प्रकाशित करणारे ते पहिले भारतीय आहेत.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेला सरकार कडून वित्तपुरवठा मिळवून देण्यात सलीम अली त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशभरात विविध पक्षी अभयारण्य उभारण्याची संकल्पना आणि श्रेय हे डॉक्टर सलीम अली यांना जाते.
9) हरगोविंद खुराना :-
1968 सालचा सायकॉलॉजी मधील नोबेल पुरस्कार मार्शल डब्ल्यू निरेन बर्ग, रॉबर्ट डब्ल्यू हॉली व डॉक्टर हरगोविंद खुराना यांच्यात विभागून दिले गेले. हरगोविंद खुराना हे जगप्रसिद्ध जैवशास्त्रज्ञ होते. लुईसा ग्रॉस हॉर्विट्झ हे कोलंबिया विद्यापीठाकडून दिल जाणार पारितोषिक सुद्धा त्यांना याच वर्षी मिळालं.
पद्मभूषण 1958 त्याचबरोबर पद्मविभूषण 1976 या दोन्ही पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
10) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम :-
2002 ते 2007 पर्यंत भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेले डॉक्टर कलाम हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर कलाम यांनी भौतिक शास्त्र मध्ये पदवी, तसेच एरोस्पेस अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली होती.
सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये कलाम यांनी भारतीय सैनिकांसाठी एक छोटसं हेलिकॉप्टर बनवलं होतं. पुढे त्यांचा अनुभव, काम करण्याची पद्धत व त्यांच्या महत्त्वाच्या शोधामुळे त्यांना मिसाईल मॅन ही नवी ओळख मिळाली.
सानकासाठा एक छाटस हालकाप्टर बनवल हात. पुढ त्यांचा अनुभव, काम करण्याची पद्धत व त्यांच्या महत्त्वाच्या शोधामुळे त्यांना मिसाईल मॅन ही नवी ओळख मिळाली.
आदरणीय डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्षपद ही भूषवलेले आहे. एक विलक्षण तेज असलेले व मनमोहक व्यक्तिमत्त्वाचे कलाम हे अतिशय नम्र व्यक्ती होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे खरोखरीच संपूर्ण भारतीयांचे अभिमान आणि गर्व आहेत.
भारत भूमी ही फक्त शूरवीरांचीच नाही तर अनेक शास्त्रज्ञ, संशोधकांची भूमी आहे. तर हे होते Indian Scientists १० भारतीय शास्त्रज्ञ.
आर्यभट्ट यांच्या पासून ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत असंख्य शास्त्रज्ञ भारताने जगाला दिले. डॉक्टर होमी भाभा एम विश्वेश्वरय्या, श्रीनिवास रामानुजन, चंद्रशेखर बोस, यासारख्या अनेक शास्त्रज्ञांची नावे ही विज्ञानाच्या इतिहासात अक्षरांनी लिहिले गेले आहेत.