राष्ट्रध्वज उशिरा उतरवला; शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल बार्शीटाकळी येथील घटना indian flag tiranga 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

राष्ट्रध्वज उशिरा उतरवला; शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल बार्शीटाकळी येथील घटना indian flag tiranga 

लोकमत न्यूज नेटवर्क बार्शीटाकळी : जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत स्वातंत्र्यदिनी फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज उशिरा उतरवल्याने मुख्याध्यापिका व दोन शिक्षिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली.

स्वातंत्र्यदिनी सगळीकडे विविध कार्यक्रमांची व ध्वजारोहण समारंभांची रेलचेल असते. अशातच बार्शीटाकळी शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची मराठी शाळा येथे सकाळी नियोजित वेळेनुसार मुख्याध्यापिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेत कार्यरत इतर शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. तिरंगा ध्वज उतरवण्याची वेळ निघून गेल्यावर उशिरा सायंकाळी ७:१९ वाजता ध्वज उतरवल्याने राष्ट्रध्वजाचा अपमान झाला. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी भेट दिली. बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिका व दोन शिक्षिका यांच्याविरुद्ध राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंधक अधिनियम १९७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment