भारतीय संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत indian constitution house to house inauguration celebration
भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत…
प्रस्तावना :-
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
घर घर संविधान शासन निर्णय येथे पहा Click Here
२. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानावी मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्याानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय:-
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक/बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्याचा उद्देश खालीलप्रमाणे आहे:-
१. संविधानाची जागरूकता:-
संविधानाचे महत्व, त्यातील मूल्ये आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे.
२. शिक्षण:-
संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, आणि विविध तरतुदींचे शिक्षण देणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे.
३. मूल्यसंस्कारः-
भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल.
४. सक्रिय सहभागः-
विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदा-यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे.
५. राष्ट्रीय एकात्मताः-
व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल.
२. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था व महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्याच्या अनुषंगाने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ “घर घर संविधान” अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा / उपक्रम :-
३. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, तसेच भारतीय संविधानाच्या मुलभुत तत्वांची माहिती समाजातील उपेक्षित घटकास व्हावी यासाठी सदर कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन कार्यक्रमाच्या
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरिता संविधान संमेलनाचे आयोजन करावे.
संबंधित सर्व जिल्हाधिकारी
अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे राज्यस्तरीय घर घर संविधान समिती स्थापन करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या घर घर संविधान या कार्यक्रमांची अंमलबजावणी, देखरेख व संनियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यातील इतर आवश्यक अधिकारी यांचा समितीमधील सदस्य प्रतिनिधी म्हणून समावेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर करावा.
जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
संविधान मंचाच्या कार्याची वार्षिक योजना तयार करणे, ज्यामध्ये विविध उपक्रम,
कार्यक्रम, चर्चा सत्रे, आणि स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करणे. संविधान दिन (२६ नोव्हेंबर) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) यासारख्या महत्वाच्या
तारखावर तसेच महिनावार वेळापत्रक आखून विशेष कार्यक्रम आयोजित करणे,
सदर समितीने उपरोक्त मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त आपल्या स्तरावरून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून अधिक चांगल्या रीतीने कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी.
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ “घर घर संविधान” हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर, २०२४ पासून साजरा करावा.
५. सदर कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी करावी. तसेच संबंधित जिल्ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची खात्री व सनियंत्रण संबंधित विभागीय आयुक्त यांनी करावे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुल्यमापन करून त्याबाबतची नोंद संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त, यांच्या वार्षिक मुल्यांकन अहवालात घेण्यात यावी.
संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” हा कार्यक्रम दि.२६ नोव्हेंबर, २०२४ पासून पुढील प्रत्येक वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांनी
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४१०१०१९०८११९३२२ असा आहे. हा आदेश
डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.