दिनांक “२६ नोव्हेंबर संविधान दिन” म्हणून साजरा करणेबाबत indian constitution day celebration
: १) सामान्य प्रशासन विभाग याचे शासन निर्णय दिनांक २४ नोव्हेंबर, २००८.
संदर्भ
२) सामाजिक प्रशासन विभाग यांचे शासन परिपत्रक दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५.
३) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक दिनांक ६ नोव्हेंबर, २०१५.
४) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक, दिनांक- २२ नोव्हेंबर, २०१६.
५) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक, दिनांक- २२.११.२०१९.
६) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक, दिनांक- २०.११.२०२०.
७) केंद्र शासनाचे अ.शा.पत्र दि. ७ नोव्हेंबर, २०२२ (प्राप्त दिनांक १९.११.२०२२)
भारतीय संविधानाबाबत राज्यामध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन” म्हणून साजरा करण्याबाबत सर्व प्रशासकीय विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ”
त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग यांचे संदर्भ क्र. १ व २ शासन निर्णय व परिपत्रक यामध्ये दिलेल्या सूचनांचे
पालन करण्याबाबत खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. १. राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व
महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात यावे. संविधानबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयामार्फत त्या दिवशी संविधान यात्रा” २.
काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातोल
महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरावेत,
३. याबाबत शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध / भित्तीपत्रके / सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
४. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने, कार्यक्रम
आयोजित करण्यात यावेत.
वरील प्रमाणे सामाजिक न्याय विभागाने संदर्भ क्र. ३ ते ६ शासन परिपत्रकान्वये २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत.
तसेच संदर्भ क्र. ७ केंद्र शासनाचे अ. शा. पत्रानुसार दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून साजरा करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.
१. उत्सवांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन आणि त्याची विचारधारा टिकवून ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करणे. मागील वर्षाप्रमाणेच राज्य सरकारची सर्व कार्यालये, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादींनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आपल्या कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन आयोजित करावे.
२. संविधानिक मूल्ये आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर चर्चा/ बेबिनारसह इतर कार्यक्रम देखील आयोजित करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
तरी याबाबत दिनांक २६ नोव्हेंबर “संविधान दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने भारतीय संविधानातील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याच्या जागरुकतेसाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याबाबत वरील केंद्र शासनाने याबाबत दिलेल्या निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यातील अधिनस्त सर्व कार्यालयांना याबाबत निर्देश देण्यात यावे.