शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष न करणेबाबत increase service of servant
महोदय,उपरोक्त विषयास अनुसरुन शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे वृत्त समजले. यासंदर्भात नमूद करण्यात येते की, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून ६० वर्ष केल्याने आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांचे प्रमाण नगण्य होईल,
पर्यायाने शासन सेवेतील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरु उमेदवारांना शासन सेवेत प्रवेश करण्याची संधी हिरावली जाईल आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल, तसेच, ज्यांच्याकरिता शासन सेवेत प्रवेशाचा अंतिम २ संधी असतील असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमूळे अपात्र होतील. या सर्वच गोष्टींमूळे राज्यातील तरुण वर्गात निराशा असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्यस्थितीत शासकीय कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठीतता असल्याने शासनास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा लागत आहे. त्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुंठीततेमध्ये वाढ होऊन शासकीय कर्मचान्यांना पदोन्नती मिळणार नाही. यामुळे अधिकारी / कर्मचारी नाउमेद होऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल. तसेच, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढले त्यामुळे शासनावर आर्थिक बोजा वाढेल. सद्यस्थितीमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना नियतकालिक बेतनवाढ मिळाल्याने
त्यांचे मासिक वेतन जास्त आहे. त्यांच्याऐवजी नव्याने नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावे लागेल. त्यामुळे शासनाच्या वेतनावर होणा-या खर्चावर बचत होईल, तसेच, २ वर्षानंतर २ २ वर्षानंतर सेवानिवृत्त होणान्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ होऊन निवृत्तीवेतन व इतर अनुषांगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
होणार आहे. यासंदर्भात माझ्याशी अनेक अधिकारी / कर्मचारी व संघटनेमधील पदाधिकारी यांनी चर्चा करुन काही मुठभर व्यक्तींच्या फायद्यासाठी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष न करता त्याऐवजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.
तरी, सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम युवक वर्गावरील शासकीय सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याचा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आपणास विनंती.
हे पत्र राजकीय हेतूने प्रेरित आहे, आज खाजगी क्षेत्रात लाखो कर्मचारी ज्यांना कुठलाही शासकीय कर्मचार्याप्रामाने लाभ मिळत नाहीत परंतु रिटायर्ड मात्र शासकीय नियमाने होते त्याचासाठी निदान दोन वर्ष तरी वयोमर्यादा वाढल्यास त्यांचे दोन वर्ष आयुष तरी वाढेल तेंव्हा सर्वांना विनंती राजकीय लाभाचा हेतू ठेऊन विरोध करून लाखो लोकांना का अंगावर घेताय
अस व्हायला पाहिजे
वयोमर्यादा 60 झालीच पाहिजे काही राज्य मध्ये62 वर्षे आहे
ज्या हजारो जागा सध्या रिक्त आहेत त्या तरी सरकार भरत आहे का?आणि 58 ला निवृत्त करून तरी भरणार आहे का? अर्थात नाही.म्हणून वरील पत्राला आमचा विरोध आहे. निवृत्तीचे वय वाढविणे योग्य आहे.
55 वर्षेच योग्य आहे उरलेले दिवस मनसोक्त जगता येतील
सेवेचा कालावधी वाढ करण्यापेक्षा ५५ वर्ष करा कारण वय वाढल्यामुळे कर्मचारियांची काम करण्याची क्षमता कमी झालेली असते शिवाय क्षत्रिय कर्मचारी तर काम च करू शकत नाही त्यामुळे ५५ वर्ष सेवा निवृत्ती वय करा त्यामुळे नवीन कर्मचारी पण भरती करता येईल आणि एका रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जागी ४ जण काम करतील
खरं जर बघायला गेलं तर 58 ऐवजी ते 55 वर्ष कसे करता येईल याचाच शासनाने गांभीर्याने विचार करावा.आज कित्येक कर्मचारी असे आहेत की जे जशी जशी सेवावृत्ती जवळ येते तशी तशी कामात हलगर्जीपणा करतात मी सर्वांच्याच बाबतीत असं बोलत नाही पण बहुतांशी असंच चालतं व त्यांना सहानुभूती सुद्धा मिळते. त्यामुळे असे हत्ती पोसण्यापेक्षा नवीन तरुणांना जर संधी दिली तर खुप चांगले होईल.बेरोजगारी सुद्धा कमी करण्यासाठी मदतच होईल यांत काही शंकाच नाही.
विशेष बाब म्हणजे मी सुद्धा एक कर्मचारी आहे.माझे वय 52 वर्ष आहे तसेच मी प्रामाणिकपणे कामही करतो आहे तरीपण बेरोजगारी बघून माझं मन हळहळतं म्हणून हे सर्व मी परखडपणे माझं मत मांडत आहे बाकी अंतीम निर्णय शासनाने घ्यायचा आहे..
केंद्र सरकारी कर्मचारी व इतर राज्यांप्रमाणे ५८ वरून ६० वर्ष निवृत्तीची वयोमर्यादा वयोमर्यादा वाढवणे योग्य आहे..
हे खरे आहे की काही अधिकारी वर्गाचे हिता साठी हा निर्णय योग्य नाहीच,जे शासकीय कर्मचारीवर्ग प्रत्यक्ष फिल्ड वर काम करतात, ऊण,पाऊस,हिवाळा त्यांची पुढे शाररीक, मानसिक, कौटुंबिक या गोष्टी समजुन घेणे गरजेचे आहे,बेकारी हा मोठा प्रश्न उपस्थित आहेच
होऊ दे की पाटील तुझ कुट घोड अडलंय
खरं पाहायला गेलं तर सेवानिवृत्ती या विषयावर बोलण्यापेक्षा बेरोजगारांची भरती हा मूळ पर्याय शासनाने राबविणे गरजेचे आहे त्यामुळे बेरोजगारी कमी होईल आणि शासकीय भरती दरवर्षी होतील व प्रत्येक गरजू व्यक्तीला न्याय मिळेल याचा देखील शासनाने प्रथम विचार करण्यात यावा तदनंतर सेवानिवृत्ती संदर्भात निर्णय घेण्यात यावा
सध्या खरं तर राजकिय लोकांना काहीतरी स्वार्थ मिळावा या हेतूने काही ही निकष लावून आपण शहाणे आहोत हे दाखवायचे असते …….!!! आधी अभ्यास करा सरळ सेवेत भरती होताना वय आपण बघतोच किती वाढवलयं ते त्यां नंतर त्या व्यक्तीला किती वर्षे नोकरी मिळणार हे पण बघितलं पाहिजे…. उगाच 55 वर्ष करा आणि 58 वर्ष करा ….. शासनाला लक्षात आलं पाहिजे की 60 वर्ष हेच योग्य वय आहे निवृत्ती साठी…..
सेवानिवृत्तीचे वय 60 च हवे. बाकी राज्यात आहे केँद्रात आहे मग महाराष्ट्र काय वेगळा आहे काय
सेवानिवृत्तीचे वय वाढवू नये असे माझेही मत आहे
सेवानिवृत्तीचे वय ५५ वर्ष करून नवीन होतकरू तरुणांना शासकीय सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी .
In government sector total 10 yeras in service are enough . Any way the employee becomes seasoned for avoiding work. So must retired after 10 years regardless age. New recruits are smart, efficient, sincere , commited and enthusiastic towards job.
शासन सेवेतील वयोमर्यादा 33 वर्ष आणि वयाची 60 वर्ष करावी याचा फायदा जे उशिरा लागतात त्यांचे 2 वर्ष वाढतील आणि जे लवकर लागतात ते 33 वर्ष सेवा करून सेवा निवृत्त होतील.”त्या सेवा निवृत्त होणाऱ्यांची संख्या खूप ज्यास्त राहील व नवीन मुलांना संधी मिळेल. शासनाने 33 वर्ष सेवा किंवा 60 वर्ष वय हा फारमुला आणावा
जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी असे बोलने म्हणजे ते अभ्यासपूर्ण बोलत नाहीत
सातव्या वेतन आयोगात समान संधी मिळाली आहे ही त्यात अट अशी आहे की तेहतीस वर्षे सेवा किंवा वयाची साठ यापैकी जी आगोदर येईल ती सेवानिवृत्ती ठरते.
यामुळे उशीरा सेवेत आलेल्या लोकांना फायदा होतो तर ज्यांनी खूप वर्षे सेवा केली ते अगदी वयाच्या बावनाव्वया.वर्षी सेवानिवृत्त होतात
यामुळे आगोदर लागलेले लवकर निवृत्त होऊन संधी निर्माण होतात तर आजकाल उशीरा नोकरी लागली तर त्यांना फायदा होतो..
शिंदे शासनाने चांगला निर्णय घेतला आहे खोडा घालू नका
Your right
इतर राज्यांप्रमाणेच सेवानिवृत्तीचे वय 60 करणे योग्य आहे कारण असेही कर्मचारी उशिराने लागतात त्यांची सेवा पूर्ण होत नाही म्हणून त्यांच्यावर सुद्धा अन्याय होतो तरी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे हे अगदी योग्य आहे
60 varse nivruti kelyas lach khanyasathi ajun 2 varse vadhatil
60 varse nivruti kelyas lach khanyasathi ajun 2 varse vadhatil
असे नाही झाले पाहिजे योग्य वय 55 च असायला पाहिजे
बेरोजगारी वाढणार त्यात पण जे 60 वर्षे शिक्षक असेल तो नीट शिक्षण देवू शकणार आहे का
60 वर्षे शिक्षक चे मानसिकता नसते शिक्षण द्याचे कारण ते आधीच थकले असतात
म्हणून नवीन भरती केली च पाहिजे
आता च्या शिक्षण ते देवू नाही शकत त्या पेक्षा नवीन मुलांना शिक्षण प्राधान्य द्या
Agdi barobar 33 varsh seva kinva 60 varsh sevanivruti vay ha formula vaprat aanava
सेवानिवृत्तचे वय वाढवू नका, मि एक कर्मचारी आहे. आम्हाला काही संगणक येत नाही. नविन लोकांना संधी मिळु देण्यात यावी. ही विनंती आहे.
जर 60 वय केले तर आता नौकरी लागणार्या मुला मुलींना दोन वर्षे वाढतील कारण आता पाहिले तर 31/32 /35 वय झालेल्या ना किती वर्ष नौकरी मिळणार याचाही शासनाने विचार करावा.आपण घेतलेला निर्णय योग्य आहे. 60 वय योग्य आहे. सिनियर कॉलेज च्या लोकांना जास्त वय चालते.मग बाकी अधिकारी पण 60 वर्षाची मागणी करतात ते योग्य आहे.
ज्यांना उशिरा नौकरी मिळत असेल 38 नंतर त्यांना तरी 2 ते 4 वर्ष जास्त नौकरी देण्यास हरकत नाही नाहीतर दर् वर्षी नौकरी
भरती करण्यात यावी
अगदी बरोबर सर ‘
आज आनेक कार्यालयात 5 ते 10 पदे रिक्त आहेत . चतुर्थ कर्मचारी वर्ग पद भर्ती बंद केली आहे . त्यांच्या कामाचा बोझ इतरांवर पडत आहे . ठरावीक कंपन्या लाखो रुपये लाटून तात्पुरत्या स्वरूपात पद भर्ती करून वेढबिगारी ला खतपाणी घालत आहे . हा पैसा आणि पद्धत वरील पत्राच्या भयानकते पेक्षा ही भयानक आहे . वास्तविक कामाचा ताण येऊन आनेक लोक स्वेच्छा निवृत्ती स्वीकारत आहेत तर कित्येक मुत्यूमुखी पडत आहेत . त्यामुळे निवृत्ती चे वय 58 वरुन 60 केल्याने काहीही फरक पडणार नाही . आणि आपण जे लिहीले ते देखील खरेच आहे .
वयोमर्यादा 60 आवश्यक आहे. या राजकारण्याचे पोट भरले आहेत. बक्कळ श्रीमंत आहेत. यांना काय कळणार ?
90 ℅ राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट पहिलेच संपला आहे. आता तरी विचार करा. जे साठ वर्षात आपल्याने झाले नाही. ते आता शिंदे साहेब करत आहे त्यामुळे खोडा कश्याला करता.
25 राज्यानी निर्णय घेतला 60 वर्षे करण्याचा ते नासमज आहेत का ?