राज्यातील कोतवालांनच्या सण अग्रीममध्ये १०० टक्के वाढ increase kotval san agrim 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील कोतवालांनच्या सण अग्रीममध्ये १०० टक्के वाढ increase kotval san agrim 

राज्यातील कोतवालांना संदर्भाधिन शासन निर्णयाच्या अनुषंगाने सण अग्रिम रुपये २०००/- एवढे देण्यात येत आहे. कोतवाल यांच्या उक्त सण अग्रिमामध्ये वाढ करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने सदर अग्रिमाच्या रकमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

शासन आता असे आदेश देत आहे की, राज्यातील कोतवालांना महत्वाच्या सणानिमित्त देण्यांत येणाऱ्या सण अग्रिमाच्या रकमेत वाढ करुन रुपये २०००/- (अक्षरी दोन हजार फक्त) या ऐवजी रुपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार फक्त) इतके सण अग्रिम प्रत्येक कोतवालास देण्यात यावे. सदर सण अग्रिमाची रक्कम दहा समान हप्त्यात त्यांना देय मानधनातून वळती करुन घेण्यात यावी.

२. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहीलः-

तथापि पूर्वी घेतलेले सण अग्रिम वसूल केल्यानंतरच पुढील सण अग्रिम मंजूर करता येईल. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारीक संदर्भ ३. क्र.३९९/२०२४/व्यय-९, दिनांक २५.०९.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

शासन निर्णय क्रमांका संकीर्ण-२०२४/प्र.क्र.७८/ई-१०

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१००८१२२३२१४६१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,