आयकराच्या रकमेवर डल्ला ! कुंपणानेच शेत खाल्ले :  थकीत आयकर भरण्यासाठी पैशाची जुळवाजुळव income tax thakit 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयकराच्या रकमेवर डल्ला ! कुंपणानेच शेत खाल्ले :  थकीत आयकर भरण्यासाठी पैशाची जुळवाजुळव income tax thakit 

परतूर, (वा.) परतूर तालुक्यात शिक्षकांच्या पगारातून कपात केलेला आयकर भरलाच नाही; आयकराचा गटसाधन केंद्राचा सावळा गोंधळ. या शिर्षकाखाली दै. नवराष्ट्र ने दि. १ एप्रिल रोजी वृत्त प्रसारित केले होते. यामुळे तालुक्यातील शिक्षक वर्गात चलबिचल वाढली असून या बातमीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. काल अनेक शिक्षक हे गटसाधन केंद्रात येऊन स्वतः च्या आयकराबाबत विचारणा करत आल्याचे दिसले. यामध्ये काही शिक्षकांना त्यांच्या आयकर भरल्याच्या पावत्या दाखवल्या. मात्र, थकीत आयकर घाईगडबडीत भरल्याने व आकड्यांची जुळवाजुळव केल्याने शिक्षक समाधानी दिसून आले. कुंपणाने शेत खाल्ले असे म्हणतात. अगदी असाच प्रकार परतूर गट साधन केंद्रात सुरु असल्याची दाट शक्यता आहे. शिक्षकांना वर्षातून एकदाच आयकर भरण्याचे दडपण येऊ नये म्हणून त्यांच्या पगारातून दरमहा काही रक्कम कपात केली जाते व ती मुख्याध्यापकांमार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यातून दरमहा, दर तीन महिन्याने, सहा महिन्याने किंवा वर्षातून एकदा म्हणजे चालू आर्थिक वर्ष ३१ मार्चपर्यंत आयकर विभागात जमा करावी लागते. यामुळे शिक्षक यांच्यावर ताण पटत

शासन कारवाई करणार ?

गटशिक्षण अधिकारी संतोष साबळे यांनी शिक्षकांच्या पगारातून दर महिन्याला आयकर कपात केला. ज्या शिक्षकांनी महिन्याला आयकर जमा केला अशा काही शिक्षकांचे पगार थकविले. एवढे करून ही गेली अनेक महिन्यांचा आयकर हा आर्थिक वर्ष २०२५ संपले तरीही थकीत रक्कम भरलेली नाही. शिक्षकांनी दरमहा आयकर जमा केला नाही तर त्याचा पगार थकवितात मग तालुक्यातील शेकडो शिक्षकांचा कपात केलेला आयकर वेळेवर शासनाकडे न जमा करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी साबळे यांच्यावर शासन काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. हा प्रकार म्हणजे कुंपणाने शेत खाल्ल्याची दाट शक्यता आहे. यामुळे अनेक शिक्षकांना आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे चित्र सध्या आहे.

१० लाख काढली गेल्याची अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष कबुली

दर महिन्याला शिक्षकांच्या पगारातून कपात केलेला आयकर हा ३१ मार्च अखेर आयकर विभागाच्या खात्यात वर्ग केला असे संबंधित अधिकारी सांगतात. आज दैनिक नवराष्ट्र चे प्रतिनिधी सदरील खात्याचे बैंक स्टेटमेन्ट पाहण्यासाठी साबळे यांना जाऊन चौकशी केली, यावर सदरील खात्यातून ५-१०, १०-१५ लाख रक्कम काढली ढली गेली अशी प्रत्यक्ष कबुली दिली. यावर गटविकास अधिकारी राजेश तांगडे व वरिष्ठ काय कारवाई करणार. तसेच अपहाराची ही रक्कम नेमकी किती ते बँक स्टेटमेंट हातात आल्यावर कळेलच.

गटशिक्षणाधिकारी धमकावत असल्याची तक्रार

या प्रकरणाचा गटसाधन केंद्रापासून ते शिक्षणाधिकारी (प्रा.) कार्यालयापर्यंत सतत पाठपुरावा करणारे कान्हाळा शाळेचे मुख्याद्यापक रामेश्वर हातकडके यांना साबळे यांनी ३० मार्च रोजी ७० लाख जमा आहेत असे सांगितले होते. मात्र, हाच आकडा रात्रीतून वाढून ३१ मार्च रोजी १ कोटी ३२ लाख जमा आहे. असे गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी सांगितले. एवढे पैसे रात्रीतून खात्यावर कोठून आले या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही. या विषयी हातकडके व मुख्याध्यापक संघटनेने वरिष्ठांकडे निवेदन दिले होते. यावर संतोष साबळे यांना माहिती विचारली होती. ० त्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. हातकडके यांना धमक्या देत आहेत. मार्चमध्ये भगवानबाबा वाडी या शाळेने मासिक आयकर कपात न केल्यामुळे मुख्याध्यापक मल्लाडे डी.टी. व त्यांचे मुंडे यू.बी. यांचा पगार २ महिन्यासांठी गटशिक्षणाधिकारी साबळे यांनी थांबवला होता.

Join Now