आर्थिक वर्ष २०२४-२०२५ (करनिर्धारण वर्ष २०२५-२०२६) करीता आयकर कपाती बाबतचे भारत सरकारचे परिपत्रक निदर्शनास आणणेबाबत income tax deduction
संदर्भ भारत सरकार, वित्त मंत्रालय, महसूल विभाग, केंद्रीस प्रत्यक्ष कर मंडळ यांचे परिपत्रक क्रमांक : ३/२०२५/एफ क्र.२७५/१०७/२०२४-आयटी (बी), दि. २०.०२.२०२५.
शासन परिपत्रक :-
भारत सरकारच्या संदर्भाधिन परिपत्रकान्वये वित्तीय वर्ष २०२४-२०२५ (कर निर्धारण वर्ष २०२५-२०२६) करीता आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रांसह भारत सरकारच्या www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग / विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी भारत सरकारच्या उपरोल्लेखित परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०३०४१७४९०६३००५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
DR RAJENDRA