100 मराठी सामान्य ज्ञान प्रश्न hundred general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

100 मराठी सामान्य ज्ञान प्रश्न hundred general knowledge questions

 

1. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

➡️गोदावरी.

 

2. शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

➡️बॉक्सिंग.

 

3. भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

➡️गंगा.

 

4. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

➡️प्रा.सुरेश तेंडुलकर.

 

5. जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

➡️१ ऑगस्ट.

 

6. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?

➡️मुंबई उपनगर

 

7. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?

➡️गडचिरोली

 

8. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण?

➡️ सावित्रीबाई फुले

 

9. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा

➡️सिंधुदुर्ग

 

10. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ➡️रत्नागिरी

 

11.सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?

➡️गडचिरोली

 

12. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?

➡️मुंबई

 

13. भारताची आर्थिक राजधानी कोणती ?

➡️मुंबई

 

14. सात बेटांचे शहर कोणते ?

➡️मुंबई

 

15. महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ?

➡️अहमदनगर

 

16. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ?

➡️कोल्हापूर

 

17. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ?

➡️कोल्हापूर

 

18. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ?

➡️गडचिरोली

 

19. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?

➡️जळगाव

 

20. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ?

➡️नागपूर

 

21. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ?

➡️नांदेड

 

22. मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात

➡️नाशिक

 

23. आपल्या देशाचे नाव काय आहे ? ➡️भारत

 

24. भारताची राजधानी कोणती? ➡️दिल्ली

 

25. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ➡️तिरंगा

 

26. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ➡️त्रिमुख सिंह

 

27. भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ➡️सत्यमेव जयते

 

28. भारताचे राष्ट्रगीत कोणते ?

➡️जन-गण-मन

 

29. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ➡️ कमळ

 

30. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? ➡️मोर

 

31. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? ➡️वाघ

 

32. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?

➡️वंदे मातरम

 

33. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ? ➡️हिंदी

 

34. भारताची राष्ट्रलिपी कोणती ? ➡️देवनागरी

 

35. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ? → ➡️आंबा

 

36. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? ➡️हॉकी

 

37. भारताची राष्ट्रीय नदी कोणती ? ➡️ गंगा

 

38. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? ➡️ वड

 

39. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

➡️डॉल्फिन

 

40. भारतातील एकूण राज्ये किती आहेत ?

➡️29

 

41. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे?

➡️ अशोक चक्र

 

42. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ?

➡️ 24

 

43. भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो

➡️15 ऑगस्ट

 

44. भारताचा प्रजासत्ताकदिन कधी असतो ?

➡️ 26 जानेवारी

 

45. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

➡️हरावत (हरियाल)

 

46. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?

➡️शेकरू

 

47. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल काणत ? ➡️तामन (मोठा बोंडारा)

 

48. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ? ➡️आंबा

 

49. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? ➡️मराठी

 

50. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?

➡️मुंबई

 

51. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?

➡️नागपूर

 

52. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?

➡️36

 

53. वर्षातील एकूण दिवस किती असतात ?

➡️365

 

54. वर्षाचे एकूण आठवडे किती ? → ➡️52

 

55. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?

➡️71%

 

56. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे ?

➡️ 29%

 

57. पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

➡️चंद्र

 

58. तिळगूळ कोणत्या सणाला वाटतात ➡️ मकरसंक्रांत

 

59. मकरसंक्रांतीचा सण केव्हा असतो ➡️14 किंवा 15 जानेवारी

 

60. हिंदूंचे नव वर्ष केव्हा सुरू होते ? ➡️गुडीपाडवा

 

61. नाताळचा सण केव्हा असतो ? ➡️25 डिसेम्बर

 

62. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात ?

➡️नागपंचमी

 

63. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता ?

➡️रक्षाबंधन

 

64. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले ? ➡️लोकमान्य टिळक

 

65. दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे ?

➡️विजयादशमी

 

66. शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता ? ➡️बैलपोळा

 

67. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात?

➡️लक्ष्मी

 

68. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात ?

➡️आपटा

 

69. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता ? ➡️रामनवमी

 

70. श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता ?

➡️गोकुळाष्टमी

 

71. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय ?

➡️प्राणवायू

 

72. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा कोण?

➡️ सचिन तेंडूलकर

 

73. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात ?

➡️ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

 

74. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

➡️शुक्र

 

75. स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता ?

➡️ शनी

 

76. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

➡️गुरु

 

77. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता ?

➡️शुक्र

 

78. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता ?

➡️ पौर्णिमा

 

79. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता ?

➡️अमावस्या

 

80. मोरगावच्या गणपतीचे नाव काय? ➡️मोरेश्वर

 

81. ओझरच्या गणपतीचे नाव काय? ➡️विघ्नेश्वर

 

82. थेऊरच्या गणपतीचे नाव काय? ➡️चिंतामणी

 

83. लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय ? ➡️गिरिजात्मक

 

84. रांजणगावच्या गणपतीचे नाव काय ? ➡️महागणपती

 

85. पालीच्या गणपतीचे नाव काय ? ➡️बल्लाळेश्वर

 

86. महडच्या (मढच्या) गणपतीचे नाव काय ?

➡️विनायक

 

87. सिध्दटेकच्या गणपतीचे नाव काय

➡️सिध्दीविनायक

 

88. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

➡️ यशवंतराव चव्हाण

 

89. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?

➡️रमेश बैस

 

90. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?

➡️मुंबई

 

91. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? –

➡️मुंबई

 

92. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

➡️मुंबई

 

93. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

➡️ गंगापूर

 

94. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

➡️ कर्नाळा

 

95. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

➡️ खोपोली

 

96. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?

➡️तारापूर

 

97. महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ?

➡️ मुंबई

 

98. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते ?

➡️ राहुरी

 

99. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?

➡️प्रवरानगर

 

100. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोणती?

➡️ इचलकरंजी

Leave a Comment