१०० दिवस कृती कार्यक्रमातर्गत केलेल्या कामकाजाचे तपासणीबाबत hundred days action plan
१०० दिवस कृती कार्यक्रमातर्गत केलेल्या कामकाजाचे तपासणीबाबत. संदर्भ मा. मु.का.अ. यांचेकडील परिपत्रक जा.क्र. साप्र/आस्था १८/२०/२०२५ दि. १३/०१/२०२५.
उपरोक्त संदर्भिय विषयांन्वयें सर्व गटविकास अधिकारी यांना कळविण्यात येते की, शासकीय कार्यालयातील कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होवून, जनतेच्या तक्रारींचे निराकरण तत्परतेने जिल्हास्तरावरच व्हावे, शासकीय योजनांची प्रचार-प्रसिध्दी गावपातळीपर्यंत व्हावी, विविध यंत्रणांमार्फत करण्यात येणारी विकास कामे व योजना अंमलबजावणी गुणवत्तापूर्वक व अधिक प्रभावीपणे होणेसाठी १०० दिवस कालावधीकरीता संदर्भिय परिपत्रकान्वयें ०७ कलमी कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे. सदर परिपत्रकान्वये करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने सर्वांना स्प्रेडशीट उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामध्ये वेळोवेळी माहिती अद्यावत करावयाचे कामकाज करण्यात येते.
त्या अनुषंगाने सर्व पंचायत समितींनी १०० दिवस कृती कार्यक्रमातर्गत केलेल्या कामकाजाची फेर पडताळणी करणेसाठी सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ट प्रशासन अधिकारी यांची नियुक्ति करणेत येत आहे. सोबतच्या तक्त्यातील पंचायत समिती व तपासणी करावयाचे अधिका-यांचे नांव नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार दि. १२/०३/२०२५ रोजी नेमुन दिलेनुसार सर्व पंचायत समितींनी स्पेंडशीटमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे व संदर्भिय परिपत्रकात नमुद केलेल्या ०८ बाबींनुसार केलेल्या कार्यवाहीची फेरपडताळणी करुन विहित प्रपत्रात अहवाल सामान्य प्रशासन विभागात सादर करावयाचा आहे,
सोबत नेमून दिलेल्या कर्मचा-यांना तपासणी कामी कार्यमुक्त करावे.