इयत्ता बारावीचा निकाल जाहीर : या सहा अधिकृत लिंकवर निकाल पहा hsc result 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर : या सहा अधिकृत लिंकवर निकाल पहा hsc result

➡️सर्वात प्रथम खाली दिलेल्या 6 पैकी कोणत्याही एका वेबसाईटवरती क्लिक करा.

➡️तुमचा Roll Number टाका.

➡️त्यानंतर तुमच्या हॉल तिकीटवर असलेले तुमचे आईचे नाव टाका.

➡️View Result या टॅबवर क्लिक करा.

➡️तुम्ही जर माहिती योग्य टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

➡️खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढा.

इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी च्या अधिकृत सहा लिंक खालील प्रमाणे आहेत 

Click करा निकाल पहा 👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१. mahresult.nic.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२. http://hscresult.mkcl.org

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३. www.mahahsscboard.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४. https://results.digilocker.gov.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५. www.tv9marathi.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६.http://results.targetpublications.org

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.

प्रकटन

विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकालाबाबत

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. mahresult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. www.tv9marathi.com

६. http://results.targetpublications.org

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार, दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

Leave a Comment