फेब्रुवारी-मार्च २०२५ (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत hsc online Hallticket 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२५ (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत hsc online Hallticket 

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ पासून Admit Card या Link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील.

१. फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. माध्यमिक शाळांनी इ.१० वी

२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.

३. ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.

४. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No. विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “Extra Seat No. Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.

५. Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव/आईचे नाव / जन्मतारीख जन्मठिकाण अशा दुरूस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या Online पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता Application

Hall ticket 2020

Page 99

Correction ही Link उपलब्ध करून देण्यात आलेली असून विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर “Correction Admit Card” या Link व्दारे सुधारीत Admit Card उपलब्ध होतील. विषय/माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.

६. ज्या आवेदनपत्रांना “Paid ” असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून “Late Paid Status Admit Card” या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.

७. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

८. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

माध्यमिक शाळांना प्रवेशपत्र download करण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधणेकरीता सूचित करण्यात यावे. विभागीय मंडळानी व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ यांचेशी पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा. No Candidate केलेल्या परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संबंधित परीक्षार्थ्यांना वितरीत करू नयेत, अशी स्पष्ट सूचना संबंधित मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी.

उपरोक्तनुसार आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना व विद्यार्थ्यांना अवगत करून देण्याबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.