इ.१०वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला,चित्रकला,लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ hsc exam update
फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/ एस.डी.२ दि. २४/११/२०१७
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची
कार्यवाही करण्यात येते. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. ०५ मध्ये याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेकडे दि. १५ डिसेंबर अखेर व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे सदरचे प्रस्ताव सादर करावयाची अंतिम तारीख १५ जानेवारी अशी नमूद आहे
तथापि शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ चा निकाल जानेवारी २०२५ च्या दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येणार असल्याने शास्वीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव स्विकारण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्याबाबत विविध संघटनांनी या कार्यालयाकडे विनंती केली आहे. त्याअनुषंगाने सदर प्रस्ताव स्विकारण्याच्या दोन्ही तारखांना खालीलप्रमाणे मुदतवाढ या वर्षासाठीच देण्यात येत आहे.
तरी उपरोक्तनुसार सर्व विभागीय मंडळांनी योग्य ती कार्यवाही करावी. सदर मुदतवाढ आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देवून त्याप्रमाणे मुदतीत कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे. तसेच आपल्या स्तरावरुन याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी व कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.