इ.10वी 12 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ शिक्षासूची वाचनाबाबत एसएससी hsc exam shiksha suchi reading
उपरोक्त विषयाचे संदर्भात सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेत विविध मार्गानी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. याचधर्तीवर विद्याथ्यर्थ्यांन परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये यासाठी गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यास मंडळाच्या शिक्षासूचीनुसार होणारी कारवाई अवगत करणे आवश्यक आहे.
यासाठी सदर पत्रासोबत विद्यार्थ्यांसाठी असणारी शिक्षासूची तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असणा-या सूचना यांचे सामूहिक वाचन शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या समोर परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत करणे आवश्यक आहे, शक्य असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांस त्याची प्रत देण्यात यावी, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेवून सदरचा दस्तऐवज आपल्या दप्तरी ठेवण्यात यावा. याबाबत कार्यवाही केल्याबाबतचे प्रमाणपत्र सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी न चुकता आपआपल्या विभागीय मंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावे. सर्व विभागीय मंडळांचे ई-मेल आयडी सोबत जोडण्यात आले आहेत.
तसेच परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे सकाळ सत्रात १०.३० नंतर व दुपार सत्रात २.३० नंतर परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही याबाबतही विद्यार्थ्यांना सूचित करावे..
विद्यार्थ्यांसाठी शिक्षासूची, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूच्या सूचना व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर करावयाचे प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी या पत्रासोबत जोडला आहे तरी उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करावी.