(इ.12 वी) परीक्षा सन 2024-25 च्या उत्तरपत्रिका मुल्यमापनासाठी शिक्षकांची नावे सादर करण्याबाबत hsc exam answer paper cheking
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12दी) परीक्षा शै. वर्ष सन 2024-2025 च्या उत्तरपत्रिका मुल्यमापनाच्या गोपनीय व कालमर्यादीत कामासाठी बदली झालेले, कॉलेज सोडून गेलेले, सेवानिवृत्त झालेले व मयत झालेले शिक्षकांची नावे वगळून त्याऐवजी नवनियुक्त केलेल्या शिक्षकांची माहिती (पॅनेल) मंडळास सादर करणेबाबत….
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) फेब्रु-मार्च 2025 च्या परीक्षेसाठी सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकविल्या जाणा-या सर्व विषयांच्या विषय शिक्षकांची माहिती उत्तरपत्रिका मुल्यमापनासाठी परीक्षक व नियामक नियुक्ती तसेच प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थः परीक्षक म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे.
त्यानुसार सदर कानी आपल्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले सर्व विषय शिक्षकांची (शिक्षक पॅनेल) माहिती परिपूर्ण मंडळास सादर करावी. शिक्षक माहिती सादर करताना खालील सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे. शिक्षक माहिती (पॅनेल) भरावयाच्या सुचना
1. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी यापुर्वी मार्च 2024 मध्ये शिक्षक माहिती मंडळाकडे सादर केलेली आहे अशा सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी सोबत दिलेल्या तक्यामध्ये बदली झालेले, कॉलेज सोडून गेलेले, सेवानिवृत्त झालेले व मयत झालेले शिक्षकांची नावे वगळून त्याऐवजी नवनियुक्त केलेल्या शिक्षकांची नावे नमूद करावयाची आहेत.
2. तसेच जे शिक्षक इतरत्र बदली होवून गेले आहेत किंवा मंडळाचे कार्यक्षेत्राबाहेर बदली होवून गेलेले आहेत अशा शिक्षकांच्या नावासमोर ते ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बदली होवून गेले आहेत त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव व पत्ता, संपर्क कंमाक इत्यादि माहिती लाल शाई पेनाने नमूद करुन दयावयाची आहे.
3. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने फेब्रु-मार्च 2025 करिता शिक्षक पॅनेल माहिती मंडळास सादर न केल्यास फेबु-मार्च 2024 परीक्षेतील नियुक्त्या ग्राहय धरुन फेब्रु-मार्च 2025 परीक्षेसाठी उत्तरपत्रिका मुल्यमापनासाठी नियुक्त्या देण्यात येईल यांची प्राचार्यानी गांभीर्याने नोंद घ्यावी. मंडळाने यापूर्वी शिक्षक माहिती (पॅनेल) ची मागणी करुनही अद्यापपर्यंत ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी 4.
शिक्षक माहिती मंडळाकडे सादर केलेली नाही अशा सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी सोबतच्या तक्त्यात परिपूर्ण माहिती भरुन खालील निर्धारीत दिनांकास मंडळाकडे समक्ष सादर करावयाची आहे. मुदतीनंतर व अपूर्ण पॅनेलची माहिती पूर्ण करण्यासाठी समक्ष मंडळ कार्यालयात स्वखर्चाने येवून सादर करावी लागेल,
5. तसेच मंडळास असे निदर्शनास आले आहे की, संस्थेकडून कांही विषयास रिक्त पदावर शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेल्या शिक्षकांची अर्धवेळ व तासिका तत्वावर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात विषय शिक्षकांची नियुक्ती केली जाते. व त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण होताच विषय शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयातून कार्यमुक्त केले जाते. अशा नियुक्त शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेण्याची जबाबदारी ही प्राचार्यांची असते हे ज्ञात असूनही उत्तरपत्रिका मुल्यमापनाचे काम केले जात नाही. तरी संस्थेचे सचिव व प्राचार्य यांच्याकडून शिक्षकांच्या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्या दिलेल्या शिक्षकांना मंडळाच्या काम संपेपर्यंत म्हणजेच दि. 31 मे 2025 पर्यंत नियुक्ती देणे बंधनकारक आहे. जेणेकरुन उत्तरपत्रिका मुल्यमापनाचे कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही.
6. तसेच प्रशासकीय प्रमुख या नात्याने कार्यरत उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना जबाबदार धरुन महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती 1981 नुसार योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करुन सदर बाब मा. शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत शासनास कळविण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी.
7. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक माहिती (पॅनेल) मध्ये कोणताही बदल नाही अशा कनिष्ठ महाविद्यालयानी शिक्षक माहिती (पॅनेल) फॉर्ममध्ये निरंक असा शेरा नमूद करण्यात यावा. 8. सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षक माहिती समक्ष मंडळ कार्यालयात सादर करावयाचा कालावधी.