उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत hsc board exam online application 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत hsc board exam online application 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४

• प्रकटन •

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन भरावयाची असून त्यांच्या तारखा व –

तपशील खालीलप्रमाणे

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च

माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.