येत्या आठवड्यात बारावी परीक्षेचा तर मे महिन्याच्या शेवटी दहावीचा निकाल hsc and ssc result date
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. मे महिना आला की, निकालाचे वेध विद्यार्थ्यांसह पालकांना देखील लागले आहेत. ‘सीबीएसई’च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता 12 वी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक खालील लिंक वर क्लिक करून निकाल पाहू शकता
https://hscresult.mahahsscboard.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता 10 वी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक खालील लिंक वर क्लिक करून दहावीचा निकाल पहा
https://sscresult.mahahsscboard.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बारावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ५२ हजार ८७० विद्यार्थ्यांनी, तर दहावीच्या ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी १८२ केंद्रांवरून परीक्षा दिली. परीक्षा कालावधीत कॉफीचा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू झाली होती. बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करू शकते.