संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत house to house constitution amrut mahotsav

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत house to house constitution amrut mahotsav 

संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण / मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४

२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४

३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४

दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबददल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्यासाठी संदर्भ क्र १ अन्वये कळविले आहे. तसेच संविधान अमृत

महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.

संदर्भ क्र ३ अन्वये संविधान अमृत महोत्सवी वर्षात शाळास्तरावर घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र.१ व ३ नुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीतांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.

👉👉“घर घर संविधान” महोत्सव उपक्रम शासन निर्णय Click Here 

Join Now