राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना/कामगारांना या “पाच” तारखांना भर पगारी शासकीय सुट्टी जाहीर Holidays fo government servant
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करिता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.
संदर्भः- १. मूख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. जीईएन-२०२४/प्र.क्र.३४६/२४/३३, दि.२३ मार्च, २०२४.
२. भारत निवडणूक आयोगाचे यांचे क्र.ECI/PN/२३/२०२४, दि.१६ मार्च, २०२४ रोजीचे प्रसिध्द्धीपत्रक.
३. भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.४६४/L&O/२०२४/EPS, दि.२१ मार्च, २०२४.
शासन परिपत्रक :-
आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था/आस्थापना इ. त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
२. भारत निवडणूक आयोगाने दि.१६ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान राज्यात परिशिष्ट-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दि.१९ एप्रिल, २०२४, दि.२६ एप्रिल, २०२४, दि.०७ मे, २०२४, दि.१३ मे, २०२४ व दि.२० मे, २०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-
1) राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
1) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
III) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.
IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने,
या पाच तारखांना सुट्टी
लोकसभा निवडणूक 2024 वेळापत्रक 👇
दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे
खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता
येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
४. सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोगाचे यांचे क्र.ECI/PN/२३/२०२४, दि. १६ मार्च, २०२४ रोजीचे प्रसिध्द्धीपत्रक आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्र.४६४/L&O/२०२४/EPS, दि. २१ मार्च, २०२४ रोजीच्या पत्रास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०४०५१४३४२२९२१० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,