दुचाकी वापरणा-या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सक्तीने हेल्मेट परिधान करणेबाबत helmet compulsory
पुणे विभागातील दुचाकी वापरणा-या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सक्तीने हेल्मेट परिधान करणेबाबत
मा. न्यायमूर्ती श्री. अभय सप्रे, अध्यक्ष, मा. सर्वोच्च न्यायालय रस्ता सुरक्षा समिती, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८.१०.२०२४ रोजी विधानभवन पुणे येथे पुणे शहर तसेच जिल्हा व विभागातील रस्ते अपघात व पर्यायाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीस पुणे जिल्हयातील शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.
भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दुचाकी अपघातामध्ये होणा-या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकी स्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये होणा-या मृत्युंच्या संख्येमध्ये निश्चित घट होवू शकते. त्यामुळे वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणा-या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट वापराची सक्ती करावी व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी अशा सक्त सूचना मा. न्यायमूती श्री. सप्रे यांनी दिल्या आहेत.
मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालविणा-या तसेच पाठीमागे बसणा-या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे.
सबब, याद्वारे पुणे विभागातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणा-या व दुचाकीचा वापर करणा-या सर्व अधिकारी /कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक असून याचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कर्तव्य आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा १९८९ (शिस्त व अपील) मधील नियम ३ (१) च्या पोटनियम १८ व कलम १९ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.
(अठरा) ‘जे कोणत्याही कायदयाच्या, नियमांच्या, विनियमांच्या आणि प्रस्थापित प्रथेच्या विरुध्द आहे किंवा असू शकते असे कोणतेही कृत्य करण्यापासून दूर राहील’
(एकोणीस) त्यांचे कर्तव्य पार पाडताना शिस्त राखील आणि त्याला यथोचितरित्या कळविण्यात आलेल्या कायदेशीर आदेशांचे पालन करण्यास जबाबदार असेल’
जे अधिकारी / कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर म.ना.से. (शिस्त व अपील) कलम ३ (१) मधील पोटनियम (१८) पोटनियम (१९) च्या अंतर्गत कारवाई संबंधित कार्यालय प्रमुख यांनी करणेची आहे. यामध्ये कुचराई करणा-यांविरुध्द नियमानुसार शिस्तभंगविषयक प्राधिका-यांमार्फत दंड व मूळ सेवापुस्तकात नोंदही करणेत येईल याबाबत सर्वांना अवगत करावे. याची व्यापक प्रसिध्दी करणेची आहे.
जीवन अमूल्य असून प्रत्येक जीव वाचवणे महत्वाचे आहे हे तत्व लक्षात घेवून सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी रस्ते अपघात कमी होणेचे अनुषंगाने स्वतःपासून सुरुवात करावी. या यानुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना म्हणून हेल्मेट वापराची अंमलबजावणी करावी.
विभागीय आयुक्तांचे पत्र येथे पहा Click here