कृतज्ञनेची जाणीव… हृदयस्पर्शी कहाणी heart touching story
मेंढ्यांच रक्षण करताना लांडग्यांशी लढणारा मेंढपाळाचा हा शूर कुत्रा स्वतःच्याच रक्तानं माखलाय.. पण त्यासोबतची मेंढी त्याने केलेल्या लढ्याला आणि शूर योध्याला धीर देताना पाहायला मिळतेय ..
आपण स्वतः कितीही निर्भय , ताकदवान अथवा कठोर असू पण एखाद्याला त्याने घेतलेल्या प्रयत्नांबद्दल किती प्रशंसा करतो अथवा त्याचा निस्वार्थ सेवेला किती दाद देतो हे खूप महत्वाचं आहे. ज्याने तुमचं नातं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहत .
मेंढ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे रक्षण करण्यासाठी हे आपले कर्तव्य समजून आपला स्वतःचा जीव देण्यासाठी तयार होतो मेंढ्यांना जीव वाचवण्यासाठी त्यांचे रक्षण करण्यासाठी आपला आद्य काम समजतो
जो तुमच्यासाठी नेहमी सदैव तुमच्या मागे उभे राहतो अशा लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये तरीही बोल नका . तुम्हाला गरज असेल तेंव्हा स्वतः च कर्तव्य समजून हि लोक तुमच्या पाठीमागं उभी असतात, आपल्या कठीण प्रसंगात तारणहार झालेला असतात, आपल्या सारख्या दगडाला रंग रुप देऊन सामर्थ्यवंत, किर्तीवंत मुर्ती घडवलेली असते. म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला दाद द्यायला विसरू नका, आपल्याला दिलेलं सामर्थ्य त्यांना अपमानित करण्यात घालवु नका, त्यांना मानसिक आधार द्यायला विसरू नका .
वरून कठोर आणि आतून प्रेमळ असणाऱ्या या मंडळींना तुमच्या आपुलकीची दोन शब्द लढण्याचं नवं बळ देत असते अन् तेच बळ तुमच्या कामाला येईल हे विसरु नका.
त्यांना दाखवून द्या कि तुम्ही त्यांच्या पाठबळाप्रती कृतज्ञ आहात
रक्षण करणारा श्वान होता नाही आल तरी आभार मानणारी मेंढी बनायला विसरू नका ..🙏🙏