आंघोळीला अती गरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका डॉक्टरांचे आवाहन : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी heart attack due to cold atmosphere 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंघोळीला अती गरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका डॉक्टरांचे आवाहन : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी heart attack due to cold atmosphere 

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड अनेकजण थंडीच्या दिवसामध्ये अति गरम पाण्याचा वापर करतात. थंडीच्या दिवसामध्ये रक्तवाहिन्या अंकुचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो. अशावेळी अति गरम पाण्याने आंघोळ करणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे थंडीच्या दिवसात आंघोळ करताना अति गरम किंवा अति थंड पाण्याचा वापर करावा, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगतात. :

heart attack due to cold atmosphere वातावरणात गारठा वाढल्यानंतर अनेकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याचा मोह होतो. तज्ज्ञांच्या मते कोमट पाण्याने हिवाळ्यात आंघोळ करणे अधिक फायदेशीर असते. कोमट पाण्याने शरीराला एकदम झटका बसत नाही. शरीराचे तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. शरीर स्वच्छतेसाठी आंघोळ महत्वाची असली तरी आरोग्य चांगले राहण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करणे आवश्यक आहे.

तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची आंघोळ

अनेकजण तणावमुक्तीसाठी गरम पाण्याने आंघोळ घेतात. मात्र सतत गरम पाण्याने घेणे हे शरीरासाठीheart attack due to cold atmosphere  धोक्याचे ठरु शकते.

स्नायू मोकळे होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतो

थंडीमुळे आंकुचन पावलेले स्नायू ढिले होतात. रक्तप्रवाह सुरळीत होतो. थंडीच्या दिवसात अतिगरम किंवा गरम पाणी वापरु नये.

हृदयरुग्णांनो, थंडीत ही काळजी घ्या

हृदयाचा त्रास असलेल्या रुग्णांनी थंडीमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोवळे उन्ह पडल्यानंतर आणि थंडी गेल्यानंतरच आंघोळीला प्राधान्य द्यावे. या काळात आरोग्य बिघडण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी

थंडीत आंघोळीला कोमट पाणी चांगले

थंडीच्या दिवसात अति गरम, अति थंड पाणी वापरु नये. शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना यामुळे अधिक फटका बसत नसला तरी याचा वयोवृद्ध लहान मुलांना फटका बसतो. त्यामुळे त्यांनी कोमट पाण्याचा वापर करावा.

रक्तदाब वाढतो :

थंडीमुळे शरीर अंकुचन पावत heart attack due to cold atmosphere असल्यामुळे रक्तदाबाचा धोका असतो. त्यामुळे गरम पाणी घेणे टाळावे

कडक पाणी, साबणाने अंग तडकते

हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरम पाणी आणि साबणाचा वापर केल्यास शरीराच्या त्वचेवर भेगा पडण्याची शक्यता असते.

हृदयावर ताण वाढतो :

अति थंड किंवा अति गरम पाणी घेतल्याने हृदयावर ताण निर्माण होतो. त्यामुळे हिवाळ्यात हृदयाची काळजी घ्यावी.

वृद्ध व बालकांची काळजी घ्यावी

हिवाळ्याच्या दिवसामध्ये वृद्ध वheart attack due to cold atmosphere  बालकांची काळजी घ्यावी. त्यासोबतच हृदयविकार असलेल्यांची देखील या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक असते.

– डॉ. आनंद मालशेटवार, तज्ज्ञा