शाळेतील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणेबाबत headmaster charge sevajeshtha shikshakankade

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळेतील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणेबाबत headmaster charge sevajeshtha shikshakankade 

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने माझे असे निदर्शनास आले आहे की, जिल्हा परिषद सांगली अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक हे दिर्घ रजेवर गेल्यानंतर किंवा मुख्याध्यापक पद रिक्त असलेल्या शाळेवर किंवा संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेवर मुख्याध्यापकाचा तात्पुरता स्वरुपाचा प्रभार सदर शाळेतील कार्यरत असणाऱ्या शिक्षकांपैकी एकूण सेवा झालेल्या सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणे नियमानुसार क्रमप्राप्त आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांचेकडे कार्यालयाकडून मुख्याध्यापकाचा पदभार देणे संदर्भात आदेश पारीत करण्यात येतात. सदर आदेशावर बऱ्याच प्रमाणात पदभार स्विकारण्या संदर्भात टाळाटाळ करणे, सेवा जेष्ठ असून सुध्दा प्रभार घेण्यास अकार्यक्षम असल्याची विनंती करुन अथवा इतर कारण पुढे करुन पदभार घेण्यास नाहक कनिष्ठ शिक्षकास पदभार स्विकारण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे विनाकारण प्रशासनाचा वेळ खर्ची जावून विलंब होतो.

परिणामी शालेय स्तरावरील कामकाजात जसे गणवेश वाटप करणे, शालेय पोषणआहार, संपूर्ण आर्थिक व्यवहार तसेच वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी मागणी केल्यानुसार माहिती सादर करणे, इत्यादी कामात प्रशासकीय अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या परिपत्रकाव्दारे आपणास सुचित करण्यात येते की, ज्या शाळेतील मुख्याध्यापक हे दिर्घ रजेवर गेल्यानंतर किंवा मुख्याध्यापकाचे पद रिक्त असलेल्या शाळेवर किंवा संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेवर मुख्याध्यापकाचा प्रभार हा, तेथील एकूण सेवेने जेष्ठ असणा-या शिक्षकांकडे सोपविण्यात यावा.

सेवा जेष्ठ शिक्षकांनी पदभार घेण्यास नकार दर्शविल्यास त्यांची महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ चे ४ (दोन) मधील तरतुदीनुसार एक वार्षिक वेतनवाढ बंद करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ चे ३ चा भंग केल्याबाबत प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद सर्व शिक्षकांनी घ्यावी.

Leave a Comment