गुरुपौर्णिमा छोटे मराठी भाषण gurupornima chote marathi bhashan
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
आपल्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा गुरु बद्दल आदर आणि समर्पण यांचा सण आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मात मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा देखील म्हणतात कारण आदि गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता. व्यास पौर्णिमेच्या दिवशी || ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे || अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे.
भारतात पुरातन काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्याकाळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असे. त्याकाळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरूगृही राहात असत. ज्ञान संपादन करण्यासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञान प्राप्ती नंतर गुरूला गुरुदक्षिणा देण्यासाठी देखील गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे मात्र गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे.
भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.शुक्राचार्य- जनक,कृष्ण/सुदामा- सांदिपनी, विश्वामित्र-राम/लक्ष्मण, द्रोणाचार्य- अर्जुन अशी गुरु- शिष्य परंपरा आहे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो त्याप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श असे घडवतात.
थोर पुरुष म्हणाले आहेत की, तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला एक चांगला गुरू मिळाला पाहिजे. जे आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरूच आहे. गुरुला वयाचे जातीचे बंधन नसते. गुरु प्रमाणे शिष्य घडत असतो म्हणून आपण गुरुच्या आज्ञेचे पालन करावे.
उत्तम ज्ञान संपादन करून शाळेचा, आई-वडिलांचा, देशाचा नावलौकिक वाढवावा व एक सुजान नागरिक बनून देशसेवा करावी. गुरूंची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे . संपादन केलेल्या ज्ञानाच्या कृतज्ञतेचा एक दिवस म्हणून गुरु पौर्णिमा सर्वांनी उत्साहात साजरी करावी.
|| आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे ||
||गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार||
||गुरु म्हणजे मायबाप||
||गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप|