शा.पो.आ पाककृती धान्यादी वस्तूचे प्रमाण Gr pdf pm poshan dhanyadi vastu praman
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना तीन संरचीत (Three Course Meal) आहाराचा लाभ देणे बाबत
संदर्भ:- 1. शालेय शिक्षणव क्रीडा विभाग, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. शापोआ/2022/प्र.क्र. 117/ एसडी3 दिनांक 11 जुन 2024
2. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा. पुणे यांचे परिपत्रक जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/2023-24/1880 दिनांक 06/03/2024
3. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा.पुणे यांचे जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/2024-25/4385 दि.25/06/2024 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सदर योजने अंतर्गत इ.1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रोटीन युक्त व इयत्ता 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ परविण्यात येतो. शासन निर्णय दिनांक 02 फेब्रुवारी 2021। मधील तदतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचालाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.
केंद्र शासनाने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थाचा व
तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक स्तरावर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थाचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दींगत करणे व आहारात वैविधता आणण्याच्या दृष्टीने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळया पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत. योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्यात येत आहेत. शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने
विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे. सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांना पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार आवडीने खातील. तीन संरचित पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी/ कडधान्या पासून तयार केलेला आहार मोड अलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर / नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चत केली आहे.
1) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून पाककृती सुधारणा समितीने सुचिविलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने संदर्भिय शासननिर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. सदर पाककृतीचा तपशील परिशिष्ट अ.ब व क मध्ये पुरविण्यात आलेला आहे.
2)कार्यक्षेत्रातील स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संदर्भिय शासन निर्णयानुसार तात्काळ मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी,
3) तांदूळ व धान्यादी मालाची यापुढील मागणी नोंदविताना संदर्भिय शासन निर्णयाचे पालन होईल यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करुन यापुढील मागणी नोंदविण्या यावी.
4) तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिर्वाय आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी (अंडा पुलाव पाककृती असलेला दिवस वगळून) आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व तांदळाची खीर नाचणी सत्व देण्यात यावेत.
5) ज्या दिवशी विद्याथ्यांना आठवडयातून एकदा अंडा पुलाव (पाककृती क्र.03) या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देणार आहे. त्यादिवशी इ.1ली ते 5 वी करीता 100 ग्रॅम तांदूळ व इ.6 वी ते 8 वी करीता 150 ग्रॅम तांदळाचा वापर करुन मध्यान्ह भोजनचा लाभ देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात लाभ देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या खर्च मर्यादेत केळी, स्थानिक फळ देण्यात यावेत. सदर
दिवशी तांदळाची खीर, नाचणीस्तव व मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) देण्यात येऊ नये.
6) गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर, गुळ साखर व सोयाबीन पुलावासाठी
सोयाबीन बडी यांची आवश्यक आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी
महिन्याची दोन दिवसांच्या आहार खर्चाची पुर्ण रक्कम शाळास्तरावर वितरीत करावयाची आहे. त्या रक्कमेतून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ साखर व सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा. याबाबत गटशिक्षणाधिकारी व अधिक्षक (पीएम पोषण) यांनी शाळेच्या पटसंख्येनुसार आढावा घेवून आवश्यक अनुदान मागणी या कार्यालयास नोंदविण्यात यावी.
7) नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळाजून प्रस्तुत 7 नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळास्तरावर करण्यात येईल.
8) शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशांनुसार आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करुन सोबत जोडलेल्या पाककृती
नुसार विद्यार्थ्यांना तात्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा. 9) योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळया पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित
करण्यात आलेली आहेत. ) योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) चा लाभ देणेकरीता आपल्या स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, याबाबत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी. 10
11) शाळास्तरावर सर्व मुख्याध्यापक यांनी स्वंयपाकी तथा मदतनीस यांना संदर्भ क्र. 01 मधील शासन निर्णयातील सर्व बाबी जसे की, तीन संरचित आहार पध्दती, पाककृती शिजवुन तयार करण्याचा सविस्तर तपशील इ. समजावुन सांगुन शासन निर्णयातील सर्व बाबींचे तंतोतंत अनुपालन होईल याची दक्षता घेवुन विद्यार्थ्यांना पोषण आहार उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी.
उपरोक्त दिलेल्या निर्देशानुसार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सोबत जोडलेल्य पाककृती नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात यावा.
सोबत – दि.11/06/2024 चा शासन निर्णय व नविन निश्चित केलेली पाककृती