GPF पावती भविष्य निर्वाह निधीची पावती सेवार्थमधून कशी डाउनलोड करावी ? सोप्या पद्धतीने पहा gpf slip download link
GPF पावत्या म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची पावती सेवार्थ मधून कशा रीतीने डाउनलोड कराव्या यासंबंधी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम chrome किंवा google ब्राउझर मध्ये जाऊन खालील वेबसाईट वर जावे लागेल.
https://sevaarth.mahakosh.gov.in/login.jsp
वरील प्रकारचा इंटरफेस यामध्ये डाव्या बाजूला तीन रकाने दिसत आहेत त्यामध्ये सर्वप्रथम
➡️USERNAME – शालार्थ आयडी
➡️ PASSWORD – ifms123 सर्वांसाठी कॉमन आहे
➡️CAPTCHA CODE
वरील सर्व घटक टाकावे लागेल यामध्ये युजरनेम हे आपले शालार्थ आयडी असते तर पासवर्ड हा सर्वांसाठी कॉमन असतो तो म्हणजे ifms123 अशाप्रकारे याचा वापर करून आपण आपल्या gpf क्लिप डाऊनलोड करून घेऊ शकतो.
Default password बदलणे
युजरनेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकल्यानंतर आपणांसमोर जो इंटरफेस येईल त्यामध्ये आपल्याला नवीन पासवर्ड क्रिएट करावा लागतो तो पासवर्ड क्रिएट करून पुन्हा लॉगिन करावे लागेल व आपल्या GPF पावत्या डाऊनलोड करून घ्यावे लागतील.
GPF पावती डाऊनलोड करताना सर्वात सुरुवातीला YEAR वर्ष निवडावे लागेल तसेच MONTH निवडावा लागेल हे सर्व निवडल्यानंतर स्लिप डाऊनलोड करून प्रिंट सेव करावी लागेल.