शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत gpf online padhatine karyvahi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत gpf online padhatine karyvahi 

मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत.

संदर्भ शासन पत्र क्र. शालार्थ-११२१/प्र.क्र.४७/टिएनटी-३ दि. २४/०६/२०२४.

उपरोक्त विषयी व संदर्भीय शासनपत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे. परंतू अद्यापपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना पावत्या न मिळणे, ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणे, बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्ग न होणे इत्यादी तक्रारींच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्ययावत करून, पावत्या देणे, अग्रीम/परताव्याची देयके अदा करणे, बदली कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इत्यादी बाबी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून एक महिन्याच्या कालावधीत सर्व बाबींची पुर्तता करण्यात यावी. विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे स्वतः (व्ही.सी. द्वारे) आढावा घेणार आहेत. विहित मुदतीत भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्हयातील संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई सर्व व अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) यांच्यावर जबाबदारी निश्चित करून म.ना.से. वर्तणूक नियम १९७९ नियम ३ प्रमाणे कारवाई

प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

Leave a Comment