आरोग्यदायी “गुढीपाडवा सण महत्व” भारतीय संस्कृतीचा वारसा ghudipadva festival 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोग्यदायी “गुढीपाडवा सण महत्व” भारतीय संस्कृतीचा वारसा ghudipadva festival 

कडुलिंब हे १२ महिने सातत्याने उपलब्ध होते आणि त्याचे शरीराला होणारे फायदे खूप आहेत. कडूनिंबाच्या सेवनाचे काय फायदे आहेत आणि का खातात? गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ जाणून घेऊयात.

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, जाणून घ्या.

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण.. हा सण म्हणजे मांगल्याचा.. चैतन्याचा दिवस, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी असतो. या दिवशी अनेक शुभकार्यांची सुरूवात केली जाते. भारतातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढी उभारून त्याची पूजा केली जाते. या दिवशी श्रीखंड आणि पुरीचा खास बेत असतो, तर भारताच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये हा दिवस ‘उगादी’ म्हणून साजरा केला जातो. पण दोन्ही प्रांतात एक समानता म्हणजे लोक कडुलिंब आणि गूळ खातात. चैत्र महिन्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. या काळात उष्माघात होणे किंवा खूप उन्हात राहिल्यास आजारपण येणे या गोष्टी होऊ शकतात. आपण जे सण साजरे करतो, ज्या परंपराचे पालन करतो त्यामध्ये काहीतरी शास्त्रीय कारण असते. गुढीपाडव्याला कडुनिंब आणि गुळ खाण्याची पद्धतीमागेही असेच शास्त्रीय कारण आहे. आयुर्वेदामध्ये कडूनिंबाला खूप महत्त्व दिले जाते. कडुलिंब हे १२ महिने सातत्याने उपलब्ध होते आणि त्याचे शरीराला होणारे फायदे खूप आहेत. कडूनिंबाच्या सेवनाचे काय फायदे आहेत आणि का खातात? गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ जाणून घेऊयात.

का खातात? गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ

गुढी पाडव्याला कडुलिंबाचा पाला खाण्यामागे पारंपारिक कारणांसोबत काही वैद्यकीय कारणेही आहेत. कडुलिंबाता पाला हा चवीला कडू असला तरी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. गुळासोबत कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील

हानिकारक घटक बाहेर काढले जातात. ही वनस्पती मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच वाढत्या उष्णतेपासून कडुलिंबाचा पाला संरक्षण करतो.

कडुलिंब

उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे त्वचेशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो, कडुनिंब त्याची शक्यता कमी करण्यास मदत करते. याशिवाय कडुनिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतात आणि मधुमेहाचा धोका टाळतात. कडुलिंबाचा रस पिण्याचे फायदेशीर फायदेः कडुलिंब उन्हाळ्यात शरीराला मौसमी आजारांपासून वाचवते, याशिवाय ते चरबी जाळते. चेहऱ्यावरील मुरुम आणि खाज यापासून आराम देते. आणि कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खाज थांबते. कडुलिंबाची पेस्ट केसांच्या मुळांवर लावल्यास कोंड्याची समस्याही कमी होते. गुळात चमत्कारिक गुणधर्म आहेत. गुळ हा साखरेला सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे. केवळ याच निमित्ताने नव्हे तर वर्षभर सेवन करणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

गूळ

गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. गूळ खाल्ल्याने अॅसिडिटीची शक्यता कमी होते. गुळातील खनिजे, कर्बोदके आणि पोषक घटक हवामानातील बदलामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत करतात. तसेच, गूळ हा संतुलित आहाराच्या श्रेणीत येतो. त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच सौंदर्याच्या क्षेत्रातही अनेक फायदे होतात. गूळ मिसळून दूध पिण्याचे असे फायदे तुम्हाला कदाचित माहीत नसतील, कारण गुळामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा सुधारते. त्यामुळे कडुलिंब गूळ खा आणि निरोगी राहा.

Join Now