Ghibli आर्ट ट्रेंड आणि scam? ज्या अँप्लिकेशन किंवा साईट वरून घेतली ती आपला फोटो विकणार नाही ना? ghibli trend scam application 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ghibli आर्ट ट्रेंड आणि scam? ज्या अँप्लिकेशन किंवा साईट वरून घेतली ती आपला फोटो विकणार नाही ना? ghibli trend scam application 

सध्या चालू असलेला ट्रेंड ghibli image हा दिसायला खूप सोपा वाटतो आहे परंतु आपण याच्या पुढे जाऊन काय होईल याचा विचार केला नाही. एकाने कोणीतरी एक ghibli image बनवली आणि शेअर केली आणि जस की, *आपण ghibli image केली नाही तर आपलं भारतातील नागरिकत्वचं धोक्यात येईल अशा जोमाने सगळे जण ghibli च्या मागे लागले.* प्रत्येक माणूस ghibli काय आहे? कस करायचं? कुठे करून मिळेल? हे सगळं शोधू लागला. मग त्यात chat-gpt समोर आलं आणि त्यातून ghibli चा पाऊस पडू लागला प्रत्येकाचा स्टेटस, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळीकडे फक्त ghibli.
परंतु हे सगळं घडत असताना *सगळ्यांनीच ghibli image chat gpt कडून बनवून घेतली का? दुसऱ्या कोणत्या अँप्लिकेशन वरून तर बनवून नाही ना घेतली? ज्या अँप्लिकेशन किंवा साईट वरून घेतली ती आपला फोटो विकणार नाही ना? याची खात्री केली होती का? आपण कधीही इंटरनेट वर टाकणार नाही अश्या फोटोज चे ghibli केले नाहीत ना?* हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला हवे होते परंतु असे प्रश्न किती जणांना पडले आणि विचारले किंवा सर्च केले हे ज्याचे त्याला माहिती.
आता आपण ghibli image केली म्हणजे काय केलं? तर आपण आपल्या चेहऱ्याचे म्हणजे आपण अपलोड केलेल्या चेहऱ्याचे dimentions(परिमाणे) घेण्याची सूचना chat gpt ला दिली आणि त्याने त्यातूनच आपला ghibli बनवून दिला. हे करताना त्याने तुम्ही अपलोड केलेला प्रत्येक फोटो save केला कारण भविष्यात त्या परिमाणांचा उपयोग करून नाविन गोष्टी करू शकेल, कारण chat gpt हा शिकत जाणार AI आहे त्यामुळे तो हे करूच शकेल. यामध्ये chat gpt च्या agreement नुसार ते कोणताही फोटो, व्हिडीओ विकणार नाहीत असे म्हणतात परंतु हे आपण म्हणतो प्रत्यक्षात ते कोणीही बघू शकणार नाही किंवा कंट्रोल करू शकणार नाही हे खरे.
*भविष्यात आपल्या चेहऱ्याचे अर्धनग्न फोटो-व्हिडीओ, वेग वेगळ्या वेशात- ठिकाणी आपण आहोत असे भासवणारे फोटो-व्हिडीओ, आपली सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार झाली, ज्या ज्या ठिकाणी चेहऱ्याची परिमाणे वापरून security दिली जाईल ती secure न राहणे या सर्व गोष्टी घडल्या तर त्याच कोणत्याही प्रकारचं नवल वाटण्याचं काहीही कारण नाही.* आपण इंटरनेट हे आपल्या फायद्यासाठी वापरतो आहोत की, नुकसान करून घेण्यासाठी हा विचार करून वापरणे गरजेचे. *एखादा ट्रेंड सुरू झाला म्हणून मी ते केलंच पाहिजे असं नाही.*

सावध रहा! सुखी रहा! मदत करा! आनंदी रहा!

धन्यवाद🙏

Join Now