बीड जिल्ह्यातील 9941 घरकुलाची यादी मान्यता व निधी बाबत नावासहित घरकुल यादी इथे पहा gharkul yadi
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत बीड जिल्हयातील ९९४१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.
शासन निर्णय :-विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, बीड यांच्या अध्यक्षतेखाली दि.०९.०२.२०२४, दि.१५.०२.२०२४ व दि.०५.०३.२०२४ रोजी बैठका पार पडल्या. सदर बैठकीत जिल्हास्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयास अनुसरून संदर्भ क्र.५ येथील आदेशान्वये बीड जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सदर प्रस्ताव संदर्भ क्र.६ येथील पत्रान्वये शासन मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.
. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सन २०२४-२५ करीता बीड जिल्ह्यातील ९९४१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.११९,२९,२०,०००/- (अक्षरी रुपये एकशे एकोणीस कोटी एकोणतीस लक्ष वीस हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.४,७७,१६,८००/- (अक्षरी रुपये चार कोटी सत्याहत्तर लक्ष सोळा हजार आठशे फक्त) असा एकूण रु.१२४,०६,३६,८००/- (अक्षरी रुपये एकशे चौवीस कोटी सहा लक्ष छत्तीस हजार आठशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.१,००,००,०००/- (अक्षरी रुपये एक कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.
३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ९९४१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
१. बीड जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लामार्थ्यांपैकी
परिशिष्ट-अ मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
४. या लाभार्थ्यांनी योजनेंतर्गत तरतुदीनुसार उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी,
८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पुर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, बीड व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बीड यांची राहील.
पृष्ठ ३३६ पैकी २
शासन निर्णय क्रमांकः सचमु-२०२४/प्र.क्र.१२६/योजना-५
५.
सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय,
मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बीड यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच, सदरहू निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बीड यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच, कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, बीड व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बीड यांनी सर्व अटी व शर्तीच्या पुर्ततेशिवाय निधी खर्च करु नये. तसेच, याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.
७. याबाबतचा खर्च सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३. मुख्य लेखाशिर्ष २२२५. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरीता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२४-२५ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.
८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगित्ता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.
9941 घरकुलांची यादी नावासहित यादी येथे पहा
. ९ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४१००९१८५६०७३३३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,