300 प्रश्नांची सामान्यज्ञान प्रश्नावली general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
(१) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर — गुलाब 
———————-
(२) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर — सात
———————–
(३) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर — गरूड
——————————–
(४) आकाशाचा रंग कोणता आहे ?
उत्तर — निळा
——————————–
(५) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर — सिंह
——————————–
(६) महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?
उत्तर — ३६
——————————–
(७) आपले राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर — जनगणमन
——————————–
(८) आपला राष्ट्रध्वज कोणता ?
उत्तर — तिरंगा
——————————–
(९) आपले राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर — कमळ
——————————–
(१०) आपले राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर — आंबा 
——————————–
(११) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर — मोर
——————————–
(१२) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर — वाघ
——————————–
(१३) आपला राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर — हाॅकी 
——————————–
(१४) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर — शेकरू ( मोठी खार )
——————————–
(१५) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
उत्तर — हरियाल
——————————–
(१६) महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता ?
उत्तर — जारूळ 
——————————–
(१७) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर — मुंबई
——————————–
(१८) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर — कोय
——————————–
(१९) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर — चिंचोका
——————————–
(२०) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर — आंबट
——————————–
(२१) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?
उत्तर — हिरवा
——————————–
(२२) गायीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर — वासरू 
——————————–
(२३) लिंबाची चव कशी असते ?
उत्तर — आंबट 
——————————–
(२४) आपल्या देशाचे नाव काय ?
उत्तर — भारत
——————————–
(२५) मुख्य दिशा किती ?
उत्तर — चार
——————————–
(२६) महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती ?
उत्तर — मराठी
——————————–
(२७) आपण कोणत्या राज्यात राहतो ?
उत्तर — महाराष्ट्र
——————————–
(२८) आपल्या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर — दिल्ली
——————————–
(२९) पारंब्या कोणत्या झाडाला असतात ?
उत्तर — वड 
——————————–
(३०) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?
उत्तर — जिराफ
——————————–
(३१) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर — सोंड
——————————–
(३२) रक्ताचे रंग कसे असते ?
उत्तर — लाल
——————————–
(३३) मिठाची चव कशी असते ?
उत्तर — खारट
——————————–
(३४) मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर — खारट 
——————————–
(३५) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर — शहामृग
——————————–
(३६) विमान चालकाला काय म्हणतात ?
उत्तर — पायलट
——————————–
(३७) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर — कडू 
——————————–
(३८) आवळ्याची चव कशी असते ?
उत्तर — तुरट
——————————–
(३९) समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ?
उत्तर  — खारट 
——————————–
(४०) एका आठवड्याचे दिवस किती ?
उत्तर — सात 
——————————–
(४१) एका वर्षात किती महिने असतात ?
उत्तर — बारा
——————————–
(४२) वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात ?
उत्तर — आजोबा
——————————–
(४३) वडिलांच्या आईला काय म्हणतात ?
उत्तर — आजी 
——————————–
(४४) आईच्या वडिलांना काय म्हणतात ?
उत्तर — आजोबा
——————————–
(४५) आईच्या आईला काय म्हणतात ?
उत्तर — आजी 
——————————–
(४६) वनस्पतीचे मुख्य अवयव किती ?
उत्तर — पाच
——————————–
(४७) वनस्पतीची मुळे कोठे असतात ?
उत्तर — जमिनीत
——————————–
(४८) बगळ्याचा रंग कसा असतो ?
उत्तर — पांढरा 
——————————–
(४९) कोळी या किड्याला किती पाय असतात ?
उत्तर — आठ
——————————–
(५०) झुरळाला किती पाय असतात ?
उत्तर — सहा 
——————————–
(५१) सापाला किती पाय असतात ?
उत्तर — पाय नसतात 
——————————–
(५२)  कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर — खुराडे 
——————————–
(५३) विमाने जेथे थांबतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर — विमानतळ
——————————–
(५४) पाणी गोठवून त्यापासून काय बनवतात ?
उत्तर — बर्फ
——————————–
(५५) उपदिशा किती आहेत ?
उत्तर — चार 
——————————–
(५६) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर — पूर्व 
——————————–
(५७) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
उत्तर — पश्चिम 
——————————–
(५८) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर — पश्चिम
——————————–
(५९) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर — उत्तर 
——————————–
(६०) पृथ्वीचा आकार कसा आहे ?
उत्तर — गोल 
——————————–
(६१) चंद्राच्या प्रकाशाला काय म्हणतात ?
उत्तर — चांदणे 
——————————–
(६२) पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर — ईशान्य
——————————–
(६३) पूर्व व दक्षिण यांमधील दिशा कोणती ?
उत्तर — आग्नेय
——————————–
(६४) दक्षिण व पश्चिम यांमधील दिशा कोणती ?
उत्तर — नैऋत्य
——————————–
(६५) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर — वायव्य 
——————————–
(६६) नदीच्या काठांना काय म्हणतात ?
उत्तर — तीर / थडी 
——————————–
(६७) फणसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर — आठळी
———————————
(६८) कापसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर — सरकी 
———————————
(६९) कोणता पक्षी झाडाचे लाकूड कोरून घर बांधतो ?
उत्तर — सुतारपक्षी
———————————
(७०) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ?
उत्तर — सिंह 
———————————
(७१) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात ?
उत्तर — उंट 
———————————
(७२) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?
उत्तर — कोळी
——————————-
(७३) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?
उत्तर — कुत्रा
——————————-
(७४) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?
उत्तर — वटवाघूळ
——————————-
(७५) मुख्य ऋतू किती ?
उत्तर — तीन 
——————————
(७६) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?
उत्तर — चार
——————————-
(७७) बेडकाला किती पाय असतात ?
उत्तर — चार
——————————
(७८) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर — सहा
——————————-
(७९) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर — शहामृग
———————————
(८०) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर — सहा
——————————-
(८१) माशाला किती पाय असतात ?
उत्तर — पाय नसतात.
——————————–
(८२) आंबा या फळात किती बिया असतात ?
उत्तर — एक बी
——————————–
(८३) पेरू या फळात किती बिया असतात ?
उत्तर — अनेक बिया
——————————–
(८४)  जांभूळ या फळात किती बिया असतात ?
उत्तर — एक बी
——————————-
(८५) सिताफळात किती बिया असतात ?
उत्तर — अनेक बिया
——————————
(८६) आवळा या फळात किती बिया असतात ?
उत्तर — एक बी
———————————
(८७) एका दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर — २४ तास
——————————-
(८८) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता ?
उत्तर — पिवळा
——————————–
(८९) जेथे मीठ बनवतात त्या जागेस काय म्हणतात ?
उत्तर — मिठागर 
——————————–
(९०) मासळी कशाला म्हणतात ?
उत्तर — माशांना ( मासा )
——————————–
(९१) सजीवांचे दोन गट कोणते ?
उत्तर — प्राणी व वनस्पती 
——————————–
(९२) एका वर्षाचे दिवस किती असतात ?
उत्तर — ३६५
——————————–
(९३) एक दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर — २४ तास 
——————————–
(९४) कोणत्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ?
उत्तर — अमावास्या 
——————————–
(९५)  समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर — मीठ 
——————————–
(९६) पौर्णिमेच्या रात्री आकाशात चंद्र पूर्ण …… दिसतो.
उत्तर — वर्तुळाकार 
——————————–
(९७) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर — घरटे
———————————–
(९८) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर — छावा
———————————–
(९९) ‘ पाडस ‘ कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर — हरण
———————————–
(१००) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर — राई
———————————–
(१०१)  मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर — पोळे
———————————–
(१०२) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर — करडू
———————————–
(१०३) घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर — शिंगरू 
———————————–
(१०४) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर — बच्चा / बछडा
———————————–
(१०५) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर — रेडकू
———————————–
(१०६) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर — थवा
———————————–
(१०७) बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर — हंबरणे
———————————–
(१०८) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर — रेकणे
———————————–
(१०९) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर — ताटवा
———————————–
(११०) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर — गुच्छ 
———————————–
(१११) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर — बेट
———————————–
(११२) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर — तबेला / पागा
———————————–
(११३) कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर — पिल्लू
———————————–
(११४)  वाघाच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर — डरकाळी 
———————————-
(११५) तीळगुळ कोणत्या सणाला वाटतात ?
उत्तर — मकरसंक्रांत 
—————————-
(११६) बैलांची पूजा कोणत्या सणाला करतात ?
उत्तर — पोळा 
—————————-
(११७) बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी कोणत्या सणाला बांधते ?
उत्तर — रक्षाबंधन 
—————————-
(११८) नाताळचा सण कोणत्या महिन्यात असतो ?
उत्तर — डिसेंबर 
—————————-
(११९) पक्ष्यांना किती पाय असतात ?
उत्तर — दोन 
—————————-
(१२०)कोणता पक्षी पिसारा फुलवून नाचतो ?
उत्तर — मोर 
—————————-
(१२१) लांब मानेचा प्राणी कोणता ?
उत्तर — जिराफ 
—————————-
(१२२) सर्वांत मोठ्या कानांचा प्राणी कोणता ?
उत्तर — हत्ती 
—————————-
(१२३) वाळवंटात राहणारा प्राणी कोणता ?
उत्तर — उंट 
—————————-
(१२४) झाडावर तुरूतुरू चढणारा प्राणी कोणता ?
उत्तर — खार 
—————————-
(१२५) लांब पिसे असलेला प्राणी कोणता ?
उत्तर — मोर 
—————————-
(१२६) गूळ कशापासून तयार होते ?
उत्तर — ऊस 
—————————-
(१२७) साखर कशापासून तयार होते ?
उत्तर — ऊस 
—————————-
(१२८) हरभ-याच्या पिठाला काय म्हणतात ?
उत्तर — बेसन 
—————————-
(१२९) पोपटाचा रंग कसा असतो ?
उत्तर — हिरवा 
——————————–
(१३०) मोराच्या मादीला काय म्हणतात ?
उत्तर — लांडोर 
——————————–
(१३१) आकाशात चांदण्या केव्हा दिसतात ?
उत्तर — रात्री 
——————————–
(१३२) चौकोनाला बाजू किती असतात ?
उत्तर — चार
——————————–
(१३३) आयताला बाजू किती असतात ?
उत्तर — चार
——————————–
(१३४) चौरसाला बाजू किती असतात ?
उत्तर — चार
——————————–
(१३५) त्रिकोणाला बाजू किती असतात ?
उत्तर — तीन
——————————–
(१३६) वर्तूळाचा आकार कसा असतो ?
उत्तर — गोल
——————————–
(१३७) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?
उत्तर — १०० सेंटिमीटर
——————————–
(१३८)  १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर — १००० मीटर
——————————–
(१३९) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर — १००० ग्रॅम
——————————–
(१४०) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर — १००० मिली
——————————–
(१४१) एक महिना म्हणजे किती दिवस ?
उत्तर — ३० / ३१ दिवस 
——————————–
(१४२) २८ किंवा २९ दिवसांचा इंग्रजी महिना कोणता ?
उत्तर — फेब्रुवारी 
——————————–
(१४३) एक मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर — ६० सेकंद
——————————–
(१४४) एक तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर — ६० मिनिटे
———————————
(१४५) एक डझन म्हणजे किती वस्तू  ?
उत्तर — १२ वस्तू
———————————–
(१४६) १ फूट म्हणजे किती इंच ?
उत्तर — १२ इंच
————————————-
(१४७) १ क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम  ?
उत्तर — १०० किलोग्रॅम 
————————————-
(१४८) १ टन म्हणजे किती किलोग्रॅम  ?
उत्तर — १००० किलोग्रॅम 
——————————–
(१४९) १ तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर — १० ग्रॅम 
——————————–
(१५०) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर —  सांगता येत नाही.
——————————–
(१५१) लहानात लहान एक अंकी संख्या कोणती ?
उत्तर — १
——————————–
(१५२) मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती ?
उत्तर — ९
——————————–
(१५३) लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?
उत्तर — १०
——————————–
(१५४)  मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?
उत्तर — ९९
——————————–
(१५५) लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर — १००
——————————–
(१५६) मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर —  ९९९
———————————
(१५७) लहानात लहान चार अंकी संख्या कोणती ?
उत्तर — १०००
——————————–
(१५८) मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती ?
उत्तर — ९९९९
———————————-
(१५९) १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर — ११ वेळा 
———————————-
(१६०) १ ते १०० पर्यंत १ हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर — २१ वेळा
 
(१६१) सव्वा दोन वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?
उत्तर — २ वाजून १५ मिनिटे 
———————————–
(१६२) कापडाचा भाव …… वरून ठरवितात.
उत्तर — मीटर
——————————–
(१६३)  १ ते १० पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर — ५५
——————————–
(१६४)  फुलांचा वास आपल्याला कशामुळे कळतो ?
उत्तर — नाकामुळे 
——————————–
(१६५) पदार्थांची चव आपल्याला कशामुळे कळते ?
उत्तर — जिभेमुळे 
——————————–
(१६६) वस्तूंचा रंग आपल्याला कशामुळे कळतो ?
उत्तर — डोळ्यांमुळे 
——————————–
(१६७) कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते ?
उत्तर — काजू 
——————————–
(१६८) सूर्यापासून आपणांस कोणत्या दोन गोष्टी मिळतात ?
उत्तर — प्रकाश व उष्णता 
——————————–
(१६९) चवीचे प्रकार किती ?
उत्तर — चार 
——————————–
(१७०) सर्वांत उंच वाढणारे गवत कोणते ?
उत्तर — बांबू 
——————————–
(१७१) सर्वात मोठा प्राणी कोणता ?
उत्तर — निळा देवमासा 
——————————–
(१७२) सूर्य केव्हा उगवतो ?
उत्तर — सकाळी 
——————————–
(१७३) सूर्य मावळण्याची वेळ कोणती ?
उत्तर — संध्याकाळी 
——————————–
(१७४) फुग्यात काय भरलेले असते ?
उत्तर — हवा 
——————————–
(१७५) कावळा कोणत्या रंगाचा असतो ?
उत्तर — काळा 
——————————–
(१७६) गूळाची चव कशी असते ?
उत्तर — गोड 
——————————–
(१७७) माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर — ५२
——————————-
(१७८) पक्ष्यांना हवेत उडण्यासाठी कोणत्या अवयवांचा उपयोग होतो ?
उत्तर — पंखांचा
——————————-
(१७९) मासे पाण्यात पोहण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग करतात ?
उत्तर — परांचा 
——————————-
(१८०) घरटी न बांधणा-या पक्ष्याचे नाव सांगा.
उत्तर — कोंबडी 
——————————-
(१८१) चिमण्या काय खातात ?
उत्तर — किडे  / धान्य 
——————————-
(१८२) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?
उत्तर — कोळी 
——————————-
(१८३) सोंड असलेला प्राणी कोणता ?
उत्तर — हत्ती 
——————————-
(१८४) शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी कोणता ?
उत्तर — बैल 
——————————-
(१८५) पाय नसणारा प्राणी कोणता ?
उत्तर — साप / गांडूळ 
——————————-
(१८६) उंच भरारी घेणारा प्राणी कोणता ?
उत्तर — गरूड / घार / ससाणा 
——————————-
(१८७) माशांचा संचार कुठे असतो ?
उत्तर — पाण्यात
——————————-
(१८८) आपल्याला दूध कोणत्या प्राण्यांपासून मिळते ?
उत्तर — गाय / म्हैस 
——————————–
(१८९) दर मिनिटाला मानवी हृदय किती वेळा धडधडते ?
उत्तर — ७२ वेळा
——————————–
(१९०) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
उत्तर — कानाचे हाड
——————————–
(१९१) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
उत्तर —  मांडीचे हाड ( फिमर )
——————————–
(१९२) मानवाच्या छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात ?
उत्तर — २४
——————————–
(१९३) मानवी जिभेचा कोणता रंग त्याच्या उत्तम आरोग्याचे लक्षण दर्शवतो ?
उत्तर — गुलाबी
——————————–
(१९४) मानवाला एकूण किती दूध दात येतात ?
उत्तर —  २०
——————————–
(१९५) जन्मानंतर किती महिन्यांनी बाळाला दात येतात ?
उत्तर — सहा
——————————–
(१९६) फांदी नसलेली वनस्पती कोणती ?
उत्तर — नारळ 
——————————–
(१९७) अन्न तोंडात घालण्यासाठी हत्ती …. वापर करतो.
उत्तर — सोंडेचा 
——————————–
(१९८) जिभेला हाड असते का ?
उत्तर — जिभेला हाड नसते.
——————————–
(१९९) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते?
उत्तर — कळसूबाई 
——————————–
(२००) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते ?
उत्तर — रूपया 
——————————–
(२०१) ग्रामपंचायतीच्या प्रमुखास काय म्हणतात ?
उत्तर — सरपंच 
——————————–
(२०२) दोन नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
उत्तर — संगम 
——————————–
(२०३) हलणा-या हवेला काय म्हणतात ?
उत्तर — वारा 
———————————
(२०४) भारताचे राष्ट्रगीत गायनासाठी किती वेळ लागतो ?
उत्तर — ५२ सेकंद
———————————
(२०५) भारत देशाचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर — वंदे मातरम्
———————————
(२०६) भारत देशाचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर — रविंद्रनाथ टागोर
———————————
(२०७) भारत देशाचा स्वातंत्र्यदिन कोणता आहे ?
उत्तर — १५ ऑगस्ट
———————————
(२०८) भारत देशाचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे ?
उत्तर — २६ जानेवारी
———————————
(२०९) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर — गोदावरी 
——————————–
(२१०) जानेवारी  महिन्याचे दिवस सांगा.
उत्तर — ३१ दिवस 
——————————–
(२११) वरून काटेरी व आत रसाळ, गोड गरे असलेले फळ कोणते ?
उत्तर — फणस
——————————–
(२१२) जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर — केळी
——————————–
(२१३) नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर — संत्री
———————————–
(२१४) महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर — अरबी समुद्र 
———————————–
(२१५)  नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर — द्राक्षे
———————————–
(२१६) महाराष्ट्रात नोटा कोठे छापल्या जातात ?
उत्तर — नाशिक
———————————–
(२१७) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर — यशवंतराव चव्हाण 
——————————–
(२१८) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर — प्रतिभाताई पाटील 
——————————–
(२१९) ‘ जागतिक आदिवासी दिन ‘ म्हणून कोणता दिवस साजरा होतो ?
उत्तर — ९ ऑगस्ट 
——————————–
(२२०) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर — पंडित जवाहरलाल नेहरू

Leave a Comment