छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
(1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?
शहाजीराजे भोसले
—————————–
(२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय ?
उत्तर — जिजाबाई
—————————–
(३) छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म कधी झाला ?
उत्तर — १९ फेब्रुवारी १६३०
—————————–
(४) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
उत्तर — शिवनेरी
—————————–
(५) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पुणे
—————————–
(६) छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ ..….. होता.
उत्तर — मध्य युगाचा
—————————–
(७) छत्रपती शिवाजी महाराजांनी ….. स्वराज्य निर्माण केले.
उत्तर — महाराष्ट्रात
—————————–
(८) स्वराज्य म्हणजे काय ?
उत्तर — स्वतःचे राज्य
—————————–
(९) छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ?
उत्तर — रयतेवर अन्याय करणा-या सत्तांशी.
—————————–
(१०) शहाजीराजे हे …… गाढे पंडित होते.
उत्तर — संस्कृतचे
—————————–
(११) मावळात राहणा-या लोकांना ….. म्हणत.
उत्तर — मावळे
—————————–
(१२) शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला ?
उत्तर — फलटणचे नाईक – निंबाळकर
—————————–
(१३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय ?
उत्तर — सईबाई
—————————–
(१४) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?
उत्तर — स्वराज्य स्थापण्याचे
—————————–
(१५) शहाजीराजांच्या पत्नीचे नाव काय ?
उत्तर — जिजाबाई
—————————–
(१६) जिजाबाईचं माहेर कोणत्या घराण्यातील होते ?
उत्तर — सिंदखेडचे जाधव
—————————–
(१७) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?
उत्तर — मालोजीराजे भोसले
—————————–
(१८) शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर — मालोजीराजे भोसले
—————————–
(१९) शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर — जुन्नर
—————————–
(२०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
उत्तर — राजगड
—————————–
(२१) दादाजी कोंडदेव हे शहाजीराजांचे कोण होते ?
उत्तर — इमानी सेवक
—————————–
(२१) छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची ……
माचीवर भेटण्याची जागा निश्चित झाली.
उत्तर — प्रतापगडाच्या
—————————–
(२२) छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले ?
उत्तर — रायगड
—————————–
(२३) भोरप्या डोंगरावर शिवरायांनी ….. हा किल्ला बांधला.
उत्तर — प्रतापगड
—————————–
(२४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ?
उत्तर — पंताजी गोपीनाथ
—————————–
(२५) ‘ घोडखिंड ‘ ……… या नावानेच इतिहासात अमर झाली ?
उत्तर — पावनखिंड
—————————–
(२६) तानाजी मालुसरे हा कोकणातील कोणत्या गावाचा राहणार होता ?
उत्तर — उमरठे
—————————–
(२७) तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय ?
उत्तर — सूर्याजी
—————————–
(२८) छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली ?
उत्तर — रायगड
—————————–
(२९) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर — १६७४
—————————–
(३०) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?
उत्तर — राज्याभिषेक शक
—————————–
(३१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय ?
उत्तर — व्यंकोजीराजे
—————————–
(३२) …… ही शिवरायांची कुलदेवता होती.
उत्तर — तुळजाभवानी
—————————–
(३३) …… यांस लोक ‘ प्रतिशिवाजी ‘ म्हणत.
उत्तर — नेताजी पालकर
—————————–
(३४) शिवरायांनी तोरणा गडाचे कोणते नामकरण केले ?
उत्तर — प्रचंडगड
—————————–
(३५) शिवरायांची राजमुद्रा …… भाषेत होती.
उत्तर — संस्कृत
(३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले ?
उत्तर — १६८०