राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाम प्रदानाचे परिगणितीय तक्ते…. दि.०१ जानेवारी, २०२५ ते दि.३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीकरिता gatvima yojana

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाम प्रदानाचे परिगणितीय तक्ते…. दि.०१ जानेवारी, २०२५ ते दि.३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीकरिता gatvima yojana

१) शासन निर्णय क्र. डीओआय-२०८१/४७०१/एडीएम-५. दि.२६ एप्रिल, १९८२.

२) शासन निर्णय क्र. गवियो १०८९/प्र.क्र.६६४/८९/विमा, दि.०८ जानेवारी, १९९०.

३) शासन निर्णय क्र. गवियो १००९/प्र.क्र.५८/वर्गणी/विमा प्रशा, दि.०२ ऑगस्ट, २०१०,

४) शासन निर्णय क्र. गवियो-२०१३/प्र.क्र.४१/विमा प्रशासन, दि.०८ मे, २०१३

५०) शासन निर्णय क्र. गवियो-२०१५/प्र.क्र.४७/विमा प्रशासन, दि. ३० जानेवारी, २०१६.

६) शासन निर्णय क्र. गवियो-२०२४/प्र.क्र.०१/विमा प्रशासन, दि.३१ जानेवारी, २०२४.

प्रस्तावना :-

राज्य शासकीय कर्मबारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ या वर्षांत सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता संदर्भाधीन क्र.६ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता. त्याप्रमाणेच राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत माहे जानेवारी, २०२५ ते माहे डिसेंबर, २०२५ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाम प्रदान करण्यासाठीचा परिगणतीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाम प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्ता सोबत जोडला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी.

२ मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२५ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचाऱ्याऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी.

3 राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या परिच्छेद ८.४ अन्वये बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.०१ जानेवारी, २०२५ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याब दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.

४. सोबतचा परिगणितीय तक्ता संचालक, लेखा व कोषागारे संचालनालयाचे पत्र क्र.संलेको/गवियो/२०२५/परिगणतीय तक्ते/१०/०७/३०९ दिनांक २० जानेवारी, २०२५ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित केला आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१३१११०९०७२७०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,