इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण free education for girls
इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणान्या मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२२५२३ शैक्षणिक सवलती या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती.
हे ही वाचा
यावर्षी दिवाळीची सुट्टी 14 दिवसच मिळणार
वाचन प्रेरणा दिन साजरा करणे बाबत gr
निदेशकांची नियुक्ती व मानधनाबाबत gr
मुख्य.माझी शाळा सुंदर शाळा बक्षिस वितरण gr
राज्यातील सैनिकी शाळा सुधारणा बाबत gr
कला क्रीडा संगणक कंत्राटी शिक्षक भरती gr
या कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतन वाढ देणेबाबत
शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग क्रमांक एफईडी-१९८३/१५६७२/साशि-५दिनांक २४ ऑगस्ट १९८३ अन्वये राज्यातील शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळांतील मुलींना इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पुन्हा शासनाने राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या हेतूने ६फेब्रुवारी १९८७ पासून १ली ते १२वी पर्यंतचे शिक्षण सर्वच मुलीना मोफत केलेले आहे या योजनेचा समावेश १ली ते १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण या योजनेत १९९६-९७ पासून झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत इयत्ता ११वी १२वी या दोन इयत्तातील फक्त मुलीचा समावेश या योजनेत होतो. शैक्षणिक वर्षात किमान आवश्यक उपस्थिती आणि समाधानकारक प्रगती या अटी वर पुढील शैक्षणिक वर्षी ही सवलत चालू राहाते.
एखादी विद्याथीनी शेक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास आणि तीने त्याचवर्षात पुन्हा प्रवेश घेतल्यास विद्यादीनीला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. अनुदानित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये यांच्या वेतनावर १०० टक्के अनुदान शासनाकडून दिले जात असल्याने या योजनेखाली अनुदानित कनिष्ठ महाद्यिालयाना फक्त सत्र शुल्क प्रवेश शुल्क यांची प्रतिपूर्ती करण्यात येते. आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीत शेक्षणिक शुल्क, सत्र शुल्क, प्रवेश शुल्क यांची प्रमाणित दराने प्रतिपूर्ती करण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची अट नाही. त्यामुळे सर्व आर्थिक स्तरावरील विद्याबीनी आपोआप या योजनेला पात्र ठरतात. कुटुंबातील पहिल्या दोन अपत्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल.
इयत्ता १९ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२२५२३ चा शैक्षणिक यवलत योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेवायत संपूर्ण राज्यात एकसुत्रिपणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनावपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती सोबत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात देण्यात येत आहे.
सोबतः-
१) सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमूना प्रपत्र-१
२)शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी / मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी भरावयाचा नमूनाः प्रपत्र-२
३) शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (योजना) यांचे कार्यालयात सादर करावयाचा मागणीचा नमूना प्रपत्रः-३
४) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांचेकडे सादर करावयाचा बिल फॉर्म
नमूना प्रपत्र-४
५) इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२२५२३ शैक्षणिक सवलती या
योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती, फ्लो चार्ट (कार्यपध्दती) प्रपत्र-
६) शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांनी चारमाही अंदाजपत्रकावेळी अनुदान मागणी सादर करावयाचे नमूने
-प्रपत्र-अ.ब,क,ड.ई
सोबतः- विहित नमूने जोडले आहेत.