केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक (शिक्षण) घटकातील चौथ्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत fourth installment shasan nirnay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक (शिक्षण) घटकातील चौथ्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत fourth installment shasan nirnay

केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) उपयोजनेचा सर्वसाधारण (General) घटकातील चौथ्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत. (केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा)

वाचा :-१) राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र, क्र. मप्राशिप / सशि/४ था हप्ता /Rec, Non-Rec/(SAP, GEN, SC, ST) निधी मागणी/२०२४-२५/८६३, दि.२१.०३.२०२५.

२) केंद्र शासनाचे आदेश, क्र. F No १०-२/२०२४-९.१ (Gen) दि. २१.०३.२०२५.

३) वित्त विभागाचे परिपत्रक, दि. ०५.१२.२०२३, दि.०८.१२.२०२३. दि.२५.०७.२०२४, दि. १२.०२.२०२५ व दि.१७.०३.२०२५.

प्रस्तावना :-

राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भाधीन क्रमांक १ येथील पत्रान्वये समग्र शिक्षा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०२४-२५ करीता केंद्र शासनाने वितरीत केलेला चौथ्या हप्त्याचा निधी व त्यास समरूप राज्य हिस्स्याचा निधी वितरीत करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात समग्र शिक्षा योजनेच्या सर्वसाधारण (General) या घटकाखाली केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्सा वितरीत व खर्च करावयाचा आहे. त्यानुषंगाने वित्त विभागाच्या दि.२५.०७.२०२४ व दि.१२.०२.२०२५ रोजीच्या परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनांनुसार समग्र शिक्षा योजनेतर्गत सन २०२४-२५ या वर्षात सर्वसाधारण (General) उपयोजनेचा केंद्र हिस्सा (६०%) २२०२ आय ६२१, ३१-सहायक अनुदाने या लेखाशिर्षाखाली रु.२६७,५२,२९,०००/- इतका निधी तसेच सदर निधीच्या समरूप राज्य हिस्सा (४०%) २२०२ आय ६१२. ३१-सहायक अनुदाने या लेखाशिर्षाखाली रु. १७८,३४,८६,०००/- असे एकूण रु. ४४५,८७,१५,०००/- इतका निधी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतून वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांकरिता केंद्र शासनाने समग्र शिक्षा योजनेसाठी सर्वसाधारण (General) या घटकाकरीता वितरीत केलेला निधी केंद्र हिस्सा “मागणी क्रमांक ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०६- शिक्षक व इत्तर सेवा, (००) (०२) समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण) (केंद्र हिस्सा ६० टक्के), (२२०२ आय ६२१), ३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)” या लेखाशिर्षाखाली रु. २६७,५२,२९,०००/- इतका निधी तसेच सदर निधीच्या समरूप राज्य हिस्सा “मागणी क्रमांक ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०६- शिक्षक व इतर केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) उपयोजनेचा सर्वसाधारण (General) घटकातील चौथ्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत. (केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा).

सेवा, (००) (००) (०१) समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण), (राज्य हिस्सा ४० टक्के), (२२०२ आय ६१२), ३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)” या लेखाशिर्षांखाली रु. १७८,३४,८६,०००/- असे एकूण रु. ४४५,८७,१५,०००/- इतका निधी राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई यांचेकडे समग्र शिक्षा योजनेच्या अंमलबजावणीसाठी या आदेशान्वये सुपुर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर अनुदान सशर्त अनुदान असुन यापुर्वी वितरीत केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे. या अनुदानाच्या अटी व शर्ती सदर शासन निर्णयात नमुद केल्या आहेत.

३. सदर खर्च वित्त विभागाच्या संदर्भाधिन दि. २५.०७.२०२४, दि.१२.०२.२०२५ व दि. १७.०३.२०२५ रोजीच्या परिपत्रकामधील सूचनांनुसार करण्यात यावा. सदर निधी आहरीत करुन वितरीत करण्यासाठी अवर सचिव/ कक्ष अधिकारी (रोख/लेखा शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, यांना “आहरण व संवितरण अधिकारी” तर सह/उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय याना “नियंत्रक अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यानी निधी कोषागारातून आहरित करुन निधी समग्र शिक्षा यांच्या बँक खात्यात जमा करावा.

४. समग्र शिक्षा योजनेतील सर्व खर्च हा Single Nodal Account (SNA) मधून करण्यात यावा.

५. सदर शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी केंद्र शासनाचे दि. २१.०२.२०२५ रोजीच्या आदेशामध्ये दिलेल्या निदेशानुसार व सन २०२४-२५ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक प्रकल्प मान्यता मंडळाने (PAB) मंजूर केलेल्या समग्र शिक्षा योजनेच्या चालू योजनांच्या आवर्ती/अनावर्ती बाबीसाठी खर्च करावा. आवर्ती व अनावर्ती बाबींचा सविस्तर तपशील सोबत परिशिष्ट “अ” येथे जोडला आहे.

६. वित्त विभागाच्या संदर्भाधिन दि. २५.०७.२०२४, दि. १२.०२.२०२५ व दि. १७.०३.२०२५ रोजीचे परिपत्रकांमधील सूचनांनुसार तसेच खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी.

19. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे शासन परिपत्रक दि. २५.०७.२०२४, दि. १२.०२.२०२५ व दि. १७.०३.२०२५ अन्वये दिलेल्या सुचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२४११५०१४०४२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now