राज्यात १२,९९१ वनरक्षकांची मेगा भरती सर्व विभागात भरती जागा उपलब्ध जिल्हा निहाय जागा पहा forest guard recruitment
प्रतिनिधी | नाशिक वनविभागाद्वारे वनरक्षक पदांसाठी लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल १२,९९१ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात नागपूर विभागात सर्वाधिक १८५२, त्याखालोखाल ठाण्यात १५६८, छत्रपती संभाजीनगरमध्ये १५३५ तर नाशिक विभागात ८८८ जागांवर भरती केली जाणार आहे. भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थीनी त्यासाठी कसून सरावही सुरू केला आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाची वार्ता आहे. विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय पदभरतीसाठी जाहिराती येण्याची शक्यता असून त्यात वनविभाग, पोलिस भरतीचाही दाट शक्यता आहे. त्यापैकी वन विभागात तब्बल १२,९९१ जागांची भरती होणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण तर काही पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण अशी आहे. बोर्डाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
अर्ज ऑनलाइनच भरावा लागणार, संकेतस्थळास भेट देण्याची सूचना
वनरक्षकांच्या जागांसह इतर सर्वच पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइनच असेल. अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही. परंतु ते लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाज खासगी कोचिंग क्लासेस तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी वनविभागाच्या संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी, असे आवाहन या तज्ञांनी केले आहे. पुरुषांसाठी ५. किमी आणि महिलांसाठी ३ किमी अंतर धावण्याची चाचणी घेतली जाते. त्यासाठी उमेदवारांनी नियमित सराव करणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
या पदांसाठी संधी
वनरक्षकांच्या जागा सध्या निश्चित केल्या आहेत. इतर पदांच्या जागा निश्चित नाहीत. आगामी भरतीत वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार या पदांच्या जागांचा समावेश शक्य आहे, असे वनविभागातर्फे खासगीत सांगण्यात आले आहे.
एकूण : १२,९९१ राज्यातील जागा
वनरक्षकांच्या विभागनिहाय जागा खालील प्रमाणे
नाशिक : ८८७
छत्रपती संभाजीनगर: १५३५
नागपूर : १८५२
चंद्रपूर : ८४५
गडचिरोली: १४२३
• अमरावती : १९८८
यवतमाळ : ६६५
पुणे : ८११
• कोल्हापूर : १२८६
• धुळे : ९३१
• ठाणे : १५६८
•