परदेश शिष्यवृत्ती सर्वकष धोरण निश्चित करणे बाबत शासन निर्णय foreign scholarship dhoran gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परदेश शिष्यवृत्ती सर्वकष धोरण निश्चित करणे बाबत शासन निर्णय foreign scholarship dhoran gr 

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती या योजनेमध्ये आवश्यक समानता आणण्याकरीता सर्वंकष धोरण निश्चित करणे बाबत- अधिछात्रवृत्ती.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे पहिला मजला, मंत्रालय विस्तार भवन,

मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १० सप्टेंबर, २०२४.

वाचा:-

. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. बार्टी २०२१/ १

प्र.क्र.११६/बांधकामे, दि. २८.१०.२०२१, .

२ शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. बार्टी

२०१९/प्र.क्र.२२३/बांधकामे, दि. २८.१०.२०२१, शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सान्यावि- ३.

२०२३/प्र.क्र.६०(४)/बांधकामे, दि. ३०.१०.२०२३.

४. शासन शुध्दीपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सान्यावि-

२०२३/प्र.क्र.६० (४)/बांधकामे, दि. ९.११.२०२३.

५. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सान्यावि- २०२३/प्र.क्र.७७/बांधकामे, दि.२५.०७.२०२४.

प्रस्तावना:-

मा. मंत्रिमंडळाच्या दि.१९.१०.२०२३ रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त

शासन निर्णय क्रमांकः सान्यावि-२०२४/प्र.क्र.७५७/बांधकामे

संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या तसेच, भविष्यात प्रस्तावित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. याकरीता अ.मु.स. (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे कायमस्वरूपी समिती गठीत करण्यात आलेली आहे.

परदेश शिष्यवृत्ती शासन निर्णय pdf येथे पहा click here 

२. विभागाच्या दि.२५.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सन २०२२ च्या अधिछात्रवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने, बार्टीच्या संशोधक विद्यार्थी संघटनांकडून १०० टक्के दराने अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. त्यानुषंगाने दि. २५.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील निकषांमध्ये बदल करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय :-

एकसमान धोरणाच्या अनुषंगाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सन २०२२ च्या अधिछात्रवृत्ती योजनेतील संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय दि.११.०७.२०२४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तथापि, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या व मागणीच्या अनुषंगाने, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे व महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेंतर्गत सन २०२२ च्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मंजूर केल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती योजनेतील सन २०२२ च्या ७६३ विद्यार्थ्यांची जाहिरातीनुसार आलेल्या अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

याकरीता येणारा खर्च हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या निधीतून करावा. याकरीता शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.

पृष्ठ ३ पैकी २

शासन निर्णय क्रमांकः सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०९१०१४५०२७७०२२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने