सहलीसाठी महाराष्ट्रातील पाच महत्त्वाची पर्यटन स्थळे five spot for trip in Maharashtra
आपल्या महाराष्ट्र राज्याला एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. महाराष्टात धार्मिक पर्यटन स्थळांसोबत नैसर्गिक पर्यटन स्थळे देखील विपुल प्रमाणात आपणास पाहावयास मिळतात.
पावसाळा अणि उन्हाळा ह्या दोन त्रतुंमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील वातावरण एकदम निसर्गरम्य झालेले आपणास दिसते.
१) पाचगणी
पुणे शहरापासून शंभर किलोमीटर एवढ्या अंतरावर हे ठिकाण आहे.
पाचगणी हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे उन्हाळी पर्यटन स्थळ आहे. हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
सह्याद्री पर्वत रांगेमधील पाच डोंगरांना पाचगणी हे नाव दिले गेले आहे. पाचगणी हे स्थळ नैसर्गिक सौंदर्यासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. सप्टेंबर ते मे दरम्यान ह्या स्थळाला भेट देणे अधिक उत्तम मानले जाते.
२) माथेरान
माथेरान हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात आहे. माथेरान हे पर्यटन स्थळ मुंबई शहरापासून ८५ किलोमीटर अणि पुणे शहरापासून १२० किलोमीटर इतक्या लांब अंतरावर आहे
हे पर्यटन स्थळ उन्हाळ्यात भेट देण्यासाठी समर व्हॅकेशन मध्ये भेट देण्यासाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे.
येथील वातावरण एकदम निसर्गरम्य अणि सौंदर्याने भरलेले असते. शिवाय इथे आपणास ट्रॅकिंगचा देखील आनंद लुटता येतो.
माथेरान मध्ये इतर देखील भेट देण्यासाठी स्थळे आहेत जसे की सनसेट पॉईंट, इको पॉईंट, दसतुरी पॉईट, अशी विविध पाहण्यासारखी ठिकाणे आहेत ज्यांना आपण उन्हाळ्यात भेट देऊ शकतो.
३) अलिबाग
अलिबाग हे रायगड जिल्ह्यात असलेले पर्यटन स्थळ आहे. ज्यांना रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनातुन रिलॅक्स व्हायचे असेल अणि निसर्गाच्या सान्निध्यात नदीकिनारी आपला वेळ व्यतीत करायचा आहे अशा व्यक्तींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
अलिबाग मध्ये विविध बिचेस आहेत ज्यात अलिबाग बीच, नागाव बीच, वरसोली बीच इत्यादी अशी समुद्र किनारे आहेत जिथे आपण उन्हाळ्यात भेट देऊ शकता.
अलिबाग हे ठिकाण पुणे शहरापासून १४५ किलोमीटर अणि मुंबई शहरापासून ९५ किलोमीटर इतक्या दुर अंतरावर आहे.
४) भंडारदरा –
भंडारदरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थळ अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात आहे.
भंडारदरा येथे भंडारदरा धरण आहे धबधबा अशी अनेक बघण्यासारखी ठिकाणे आहेत. हे ठिकाण पुणे शहरापासून १६२ किलोमीटर अणि मुंबई पासून १६५ किमी इतक्या अंतरावर आहे.
५) महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे.
महाबळेश्वर हे एक निसर्गरम्य शांत मोहक अणि पाहण्यासारखे ठिकाण आहे. दुरून दुरून लोक इथे खास पर्यटनासाठी ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
महाबळेश्वर हे स्थळ पुणे शहरापासून १२० किमी इतक्या दुर अंतरावर आहे. अणि मुंबई पासुन हे ठिकाण २२० किमी इतक्या दुर अंतरावर आहे.
६) चिखलदरा
चिखलदरा हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेमधील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
उन्हाळ्यात सुटटीचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
चिखलदरा इथे भीम कुंड, इको पॉईंट देवी पॉईट, नर्सरी गार्डन अशी अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. हे ठिकाण पुण्यापासून ६०० किमी इतक्या अंतरावर आहे तर मुंबई पासून ६६३ किमी इतक्या अंतरावर आहे.
७) लोणावळा
लोणावळा हे देखील महाराष्ट्र राज्यातील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे. पुणे शहरातील लोकांसाठी पर्यटनासाठी लोणावळा हे एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.
लोणावळा येथे आपण अमृतरंजन पॉईट, लोणावळा तलाव टायगर लीप इत्यादी निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकतो.
लोणावळा हे पुण्यापासून ५०० ते मुंबई पासून ८५ पासुन किमी इतक्या अंतरावर आहे.